
BMC चे 26 जून 2025 रोजी प्रसिध्द झालेले सुचनापत्र पुढीलप्रमाणे :-
जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, दि.11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे.
सदर परीक्षेचा निकाल दि.25.02.2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामाईक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष एकुण 1825 उमेदवारांची तात्पुरती सामाईक निवड यादी तसेच, प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या सूचना पत्र क्र. एमपीआर/903 दि.08.04.2025 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत (अनुसूचित जमातीचे माजी सैनिक आरक्षणांतर्गत 21 उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आलेली आहेत.). त्यानुषंगाने दि.05.05.2025 ते दि.09.05.2025 आणि दि.27.05.2025 ते दि.29.05.2025 या कालावधीत उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे पडताळणी करण्यात आलेली आहे.
त्यानुषंगाने नियुक्तीच्या पुढील प्रक्रीयेकरिता उपस्थित रहावयाच्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत असून, सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, परिक्षेचे प्रवेश प्रत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड व अन्य सर्व कागदपत्रे, नजीकच्या कालावधीतील तीन फोटो व जन्मतारखेच्या पुराव्यासह तसेच, दिव्यांग आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बावतीत शासन निर्णय दि. 14.09.2018 नुसार चे नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय दि.05.10.2021 सोबतचे APPENDIX-1, APPENDIX-11, UDID CARD, लेखनिकाचे शैक्षणिक कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्रसह नियोजित स्थळी, दिनांक व वेळेस उपस्थित राहावे.
तसेच, सोबत संलग्नित यादीतील ‘प्रकरणाची स्थिती’ या स्तंभामध्ये ‘प्रलंबित’ नमूद असणा-या उमेदवारांच्या बाबत त्रुटीच्या पुर्ततेनंतरच नियुक्तीकरिता पात्र ठरत असल्यास नियुक्तीची पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच, निवड प्रक्रीयेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिली किंवा भरतीप्रक्रियेचे उल्लघंन केल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याला/तिला निवड प्रक्रीयेदरम्यान अपात्र ठरविण्यात येईल. तसेच, सदर बाब भरती प्रक्रीयेनंतर निदर्शनास आल्यास पूर्वलक्षी प्रभावाने उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी
भरती प्रक्रीयेअंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ तसेच इमेल उमेदवारांनी वेळोवेळी पहावे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्यसंस्थेमार्फत सरळसेवा भरतीप्रक्रिया राबविण्याकरिता दि.०२.१२.२०२४ ते दि.०६.१२.२०२४, दि.११.१२.२०२४ आणि दि.१२.१२.२०२४ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार खुला प्रवर्गांतर्गत सर्वसाधारण, महिला, अनाथ समांतर या आरक्षणांतर्गत निवड झालेल्या आणि शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीअंती खालील उमेदवारांनी नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीकरिता प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, सहावा मजला, नवीन विस्तारीत इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे दि.३०.०६.२०२५ रोजी स.११.०० ते दु.०४.०० या वेळेत उपस्थित रहावे.
BMC कार्यकारी सहाय्यक पात्र प्रलंबित Open, SC, ST उमेदवारांची यादी (26 जून 2025) Click Here
BMC Bharti 2024 Result | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 निकाल जाहीर
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024
परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार विविध प्रवर्गामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवडयादी खालील प्रमाणे
सर्व Category wise निकाल Click Here
Open Selection List PDF Click Here
EWS Selection List PDF Click Here
SEBC Selection List PDF Click Here
NT-B Selection List PDF Click Here
NT-D Selection List PDF Click Here
VJ-A Selection List PDF Click Here
SC Selection List PDF Click Here
ST Selection List PDF Click Here
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्यसंस्थेमार्फत सरळसेवा भरतीप्रक्रिया राबविण्याकरिता दि.०२.१२.२०२४ से दि.०६.१२.२०२४, दि.११.१२.२०२४ आणि दि.१२.१२.२०२४ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवडयादी खाली दिली आहे. लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील १७८ रिक्त पदांची निवड यादी प्रसिध्द होईल ती देखील आपल्या संकेतस्थळवर उपलब्ध होईल.
BMC कार्यकारी सहायक निवड यादी Click Here
जाहिरात क्र. कवसं १९१७/एमसी/२०२४-२५ दि.१६.०९.२०२४ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील १७८ रिक्त पदांकरीता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१०.१२-२०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील २६ जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरीता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आली आहे.
तद्अनुषंगाने बाह्यसंस्थेव्दारे प्राप्त झालेले सामान्यीकरण दस्तऐवज (Normalization Working Document) आणि परीक्षेचा सामान्यीकरण निकाल (Normalization Result) प्रसिध्द करण्यात येत आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पहावे.
Download BMC Bharti Inspector Result PDF Click Here
BMC Bharti 2024. The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/MCGM Bharti 2024) for 1846 Executive Assistant (Clerical) Posts.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” चे मार्क्स लिस्ट जाहीर झाले आहे.
वृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘करनिर्धारण व संकलन’ खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1,846 रिक्त पदे, ऑनलाईन अर्ज मागवून, ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरण्यात येत आहेत. सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आले असून त्यासाठी उमेदवारांनी “निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन अर्ज” या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
2 ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान कार्यकारी सहायक पदाची परीक्षा पार पडली.
दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी Response sheet उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले होते.
आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी मार्क लिस्ट उपलब्ध करुन देण्यात आले होते. मार्क्स लिस्ट PDF लिंक खाली दिलेले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) कार्यकारी सहायक
Download BMC Exam Marks List Click Here
खाली मोफत सामान्य ज्ञान Test चे लिंक दिले आहेत. खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून मोफत Test चा लाभ घ्यावा. आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर Share करा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here