● मित्र शक्ती – 2023 सराव
“मित्र शक्ती – 2023 सराव” या 9 व्या भारत- श्रीलंका संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामधील औंध येथे सुरुवात झाली. हा सराव 16 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल इंडोनेशियातील जाकार्ता इथे दहाव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकी-दरम्यान इंडोनेशियन आणि व्हिएतनामच्या संरक्षण मंत्र्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या.
● 37 वी इन्फंट्री कमांडर्स कॉन्फरन्स
37 वी इन्फंट्री कमांडर्स कॉन्फरन्स ही 2 दिवसीय परिषद बुधवारी मध्य प्रदेशातील महू येथील इन्फंट्री स्कूलमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाली.
● 17 नोव्हेंबर – राष्ट्रीय अपस्मार ( Epilepsy) दिन
राष्ट्रीय एपिलेप्सी जागरूकता दिवस 17 नोव्हेंबर आहे. या संदर्भात, एपिलेप्सी रोग, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल जनजागृती करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. एपिलेप्सी हा एक तीव्र मेंदूचा विकार असल्याचे मानले जाते जे “फिट” द्वारे चिन्हांकित केले जाते. हे सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम करत असल्याचे दिसून आले आहे.
नोव्हेंबर महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिन पहा संपूर्ण यादी Click Here
● 17 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
नाझी सैन्याने 17 नोव्हेंबर 1939 रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन स्थापन केला. या दिवशी 9 विद्यार्थी नेते आणि या घटनेदरम्यान विद्यार्थ्यांचे शौर्य अपवादात्मक होते.
● मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल
आज पासून मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. मार्ग क्रमांक 1 वरील बेलापुर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
● अभिनेते देव आनंद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावरील ‘के दिल अभी भरा नहीं’ या कॉफी टेबल बुकचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन.
● EWS प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत
8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयी सुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.
● ‘स्वाधार’ योजनेसाठी संपूर्ण १५० कोटी निधीचे वितरण
● भंडारदऱ्यात होणार देशातील पहिले वॉटर म्युझियम
उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
भंडारदरा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याच्या निमित्त या परिसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी च्या पाठपुराव्याला यश आले.
● राज्यातल्या शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापन करता येणार
राज्यातल्या शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापन करता येणार आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्त्वांना आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे विद्यापीठांवरचा ताण कमी होऊन राज्यात शैक्षणिक संस्थांचं जाळं तयार व्हायला मदत होईल. ही विद्यापीठं सार्वजनिक संस्था असतील आणि राज्यपाल त्यांचे कुलपती असतील. कुलगुरुंच्या नेमणुका राज्यपाल करतील तसंच कुलसचिव आणि इतर सात पदं निर्माण करण्यात येतील. शासन या विद्यापीठांना पहिली पाच वर्षं एक कोटी रुपये देणार आहे.
● सत्तर सावंगी बंधाऱ्याला राज्यमंत्री मंडळाची मंजुरी.
वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात सत्तर सावंगा बॅरेजच्या 173 कोटी 9 लाख रुपये खर्चाला आज (18 नोव्हेंबर) प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पामुळे वाशिम जिल्ह्यातल्या ६ गावांमधे मिळून 1 हजार 345 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
● बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला मुदतवाढ
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतींसाठी निधी वाढवण्याचा तसंच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. स्वतंत्र इमारत नसलेल्या 2 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीना 15 लाख ऐवजी 20 लाख रुपये व 2 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 18 लाख ऐवजी 25 लाख अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, यापुर्वी ग्रामपंचायत स्वनिधीची असलेली अट देखील रद्द करण्यात आली आहे.