MPSC Combined Group B Bharti 2024 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ४८० पदांची भरती

MPSC Combined Group B Bharti | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [480 जागा]

Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Pre-Examination 2024, MPSC Group B Recruitment 2024

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ४८० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, रविवार, दिनांक ०५ जानेवारी, २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण १७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

MPSC Group B Bharti 2024
MPSC Combined Group B Bharti
The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Pre- Examination 2024, MPSC Group B Recruitment 2024 (MPSC Group B Bharti 2024) for 480 Assistant Section Officer, Group B, State Tax Inspector, Group B, Sub-Inspector of Police, Group B Posts.

● परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

● पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

१) सहायक कक्ष अधिकारी (ASO), गट ब 55 पदे

२) राज्य कर निरीक्षक (STI), गट ब 209 पदे

३) पोलीस उपनिरीक्षक (PSI), गट ब 216 पदे

एकूण 480 पदे

● शैक्षणिक पात्रताः

१) सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.

२) पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

३) अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी

● वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 19 ते 31 वर्षे

पद क्र.1 & 2 साठी दिव्यांग उमेदवार वयाच्या 45 वर्षांपर्यंत; पद क्र.3 साठी अपात्र

● नोकरी ठिकाणः संपूर्ण महाराष्ट्र

● Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/ आ.दु.घ/अनाथः ₹294/-]

● परीक्षा केंद्रः महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

● निवडप्रकिया :- जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल :-

(१) सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम २०१८.

(२) राज्य कर निरीक्षक, (विक्रीकर निरीक्षक) गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम २०२१.

(३) पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम १९९५

● परीक्षेचे टप्पे :-

● विविध संवर्गाकरीता भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या टण्यामध्ये राबविण्यात येईल:
सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक या 3 ही पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 100 प्रश्न असे 100 गुणांची परीक्षा होईल. त्यानंतर या 3 ही पदांसाठी संयुक्त मुख्य परीक्षा अंतर्गत 2 पेपर होतील, पेपर 1 :- 100 प्रश्न 200 गुण आणि , पेपर 2 :- 100 प्रश्न 200 गुण असे एकूण 200 प्रश्न असे 400 गुणांची मुख्य परीक्षा होईल.

● पोलीस उपनिरीक्षक संवगांतील पदभरतीसाठी शारीरिक चाचणी १०० गुणांची असेल.

● शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी (Qualifying) स्वरुपाचे असून एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजेच ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरीता /अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.

● शारिरीक चाचणीमध्ये किमान ६० टक्के गुण धारण करणा-या उमेदवारांकरीता ४० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. ८.५ मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील एकत्रित गुणांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संवगांकरीता निवडप्रक्रिया राबविण्यात येईल.

● आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दतीनुसार पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेची अंतिम निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल.

● महत्त्वाच्या तारखा :-

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
  • पूर्व परीक्षाः 05 जानेवारी 2025

● महत्वाच्या लिंक्स :-

● संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here

● Online अर्ज लिंक Apply Online

● अधिकृत संकेतस्थळ Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● नकारात्मक गुणदान :-

१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील.

२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.

३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितअसेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही

● संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :-

विषय
सामान्य क्षमता चाचणी

१) इतिहास :- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

२) भूगोल :- महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

३) अर्थव्यवस्था :-

  • भारतीय अर्थव्यवस्था : राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
  • शासकीय अर्थव्यवस्था : अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

४) चालू घडामोडी :- जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

५) राज्यशास्त्र

६) सामान्य विज्ञान :- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

७) अंकगणित :- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

८) बुध्दिमापन चाचणी :- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

Telegram Channel Link JOIN NOW

Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment