17 जानेवारी – घटना
1773: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
1912: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
1945: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
1946: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
1956: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
2001: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
2001: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
17 जानेवारी – जन्म
1706: लेखक आणि संशोधक बेंजामीन फ्रँकलिन यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 1790)
1895: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: 3 मे 1978)
1905: भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.
1906: भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: 3 मे 2000)
1908: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: 22 जून 1994)
1917: अभिनेते व तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: 24 डिसेंबर 1987)
1918: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 2014)
1918: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ‘माल अमरोही’ यांचा जन्म. (मृत्यू: 11 फेब्रुवारी 1993)
1932: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च 1993)
1942: अमेरिकन मुष्टियोद्धा मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले यांचा जन्म.
17 जानेवारी – मृत्यू
1556: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1508)
1771: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन.
1893: अमेरिकेचे 19वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन. (जन्म: 4 ऑक्टोबर 1822)
1895: मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.
1930: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचे निधन. (जन्म: 26 जून 1873)
1961: काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक लुमूंबा यांचे निधन. (जन्म: 2 जुलै 1925)
1971: स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: 25 सप्टेंबर 1922)
1988: अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन.
1995: ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.
2000: गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.
2005: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.
2008: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1943)
2010: प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: 8 जुलै 1914)
2013: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्ना देवधर यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1926)
2014: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1931 – पाबना, बांगलादेश)