आदिवासी विकास भरती 2024 | Tribal Development Recruitment 2024

आदिवासी विकास विभाग भरती 2024
Tribal Development Department Recruitment 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

● सरळसेवा भरती – 2024

● गट (ब) अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग

●आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक / ठाणे / अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/ लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री/ गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहाय्यक/ कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२.१०.२०२४ पासुन उपलब्ध होणाऱ्या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.

● सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

संपूर्ण जाहिरात PDFDownload PDF
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक12/10/2024 दुपारी 3pm पासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक02/11/2024 रात्री 11:55 PM पर्यंत
अर्ज करण्याची लिंकApply Now (Stats From 12 Oct)

1) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.

2) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment