
वनलायनर चालू घडामोडी नोट्स 21 नोव्हेंबर
● एकता कपूर आणि वीर दास यांना प्रतिष्ठेचा ‘अॅमी’ पुरस्कार जाहीर.
विनोदी अभिनेता वीर दास तसेच चित्रपट निर्माती एकता कपूर यांना अॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वीर दासला नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या ‘वीर दास : लँडिंग’ या विशेष स्टॅण्डअप कॉमेडी शोसाठी हा पुरस्कार जाहीर झाला, तर एकताला कला व मनोरंजन क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. गोव्यात आज 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘व्हीएफएक्स’ म्हणजेच व्हिज्युअल इफेक्टस- दृष्यात्मक प्रभाव टाकणारे तंत्रज्ञान आणि ‘ टेक पॅव्हेलियन’ चं उद्घाटन ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात ‘सेव्हन्टी फाईव्ह क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या तरुण कलाकारांसाठीच्या विशेष उपक्रमाचेही उद्घाटनही ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला प्रसार आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील, अशी आशा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली.
● आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीनं पटकावलं 26 वे विजेतेपद
कतारमधील दोहा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीने इतिहास रचत आपले 26 वे विजेतेपद पटकावले. त्याने भारताच्याच सौरव कोठारी याचा 1000 विरुद्ध 416 अशा गुणांच्या फरकाने पराभव केला. त्यापूर्वी उपांत्य फेरीत त्याने गुजरातचा बिलियर्ड्स खेळाडू रुपेश शाह याचा 900 – 273 गुणांच्या फरकाने पराभव केला.
● इंडोनेशिया येथे आजपासून आसियान-भारत भरड धान्य महोत्सवाचं आयोजन
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहयोगाने, आसियान मधील भारतीय मिशन अंतर्गत इंडोनेशिया येथे 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत आसियान-भारत भरड धान्य महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला आहे. इंडोनेशियामध्ये दक्षिण जकार्ता येथील कोटा कासाब्लांका मॉल या खरेदीच्या महत्वाच्या ठिकाणी महोत्सवाचे उद्घाटन सत्र पार पडले. या महोत्सवाचा भाग म्हणून भरड धान्यांवर केंद्रित प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, यामध्ये भरड-धान्य आधारित शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), स्टार्टअप्स आणि भारतीय शेफ्स यांचा सहभाग आहे.
● भारत आणि ऑस्ट्रेलियामधील 14 वा परराष्ट्र मंत्रीस्तरीय संवादाचा नवी दिल्लीत समारोप
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील 14 वा परराष्ट्र मंत्रीस्तरीय संवादाचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. या संवादानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वाँग यांच्यात उभय देशांतील द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक मुद्द्यांसह विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चेनंतर नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या चर्चेत उभय देशांनी त्रिपक्षीय, चतुर्भुज आणि बहुपक्षीय स्वरूपांमध्ये सहकार्य करण्यावर चर्चा केली.
● प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या व्हर्च्युअल G-20 शिखर परिषद
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या व्हर्च्युअल G-20 शिखर परिषद होणार आहे. अडीच महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री दुसऱ्यांदा G-20 नेत्यांच्या परिषदेचं यजमानपद भूषवणार असल्याचं G-20 चे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज शिखर परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितले. यातून भारताची ताकद आणि जागतिक स्तरावर मोदी याचे नेतृत्व दिसून येत असे ते म्हणाले. या आभासी शिखर परिषदेत, नवी दिल्लीत सप्टेंबरमधे झालेल्या शिखर परिषदेचे महत्त्व, निवडक निकाल, आणि कृती बिंदू, तसेच तेव्हापासूनच्या घडामोडींचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्या होणाऱ्या आभासी शिखर परिषदेत G-20 मधील बहुसंख्य नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. भारताकडे 30 नोव्हेंबरपर्यंत G-20 चे अध्यक्षपद आहे.
● इस्राएलकडून लष्कर ए तय्यबा ही संघटना दहशतवादी घोषित
इस्राएलने लष्कर ए तय्यबा या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. 26 नोव्हेंबर 2008 होजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त ही घोषणा केल्याचं इस्राएलच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ही घोषणा इस्राएल सरकारने भारताच्या विनंतीवरुन केली नसून आपणहून केली असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.