प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ असलेले मनोज सोनी यांनी 16 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या स्मिता नागराज यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.
सोनी यांनी जून 2017 पासून यूपीएससीचे सदस्य म्हणून निवड झाली होती.
एप्रिल 2022 पासूनच ते UPSC चे हंगामी अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडत होते, आता 16 मे 2023 रोजी त्यांच्याकडे अधिकृतपणे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली.
मनोज सोनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ तसेच द महाराजा सयाजीराव विद्यापीठ येथे कलगुरू म्हणून काम पाहिलेले आहे.