Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध

● समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● विविध संवर्ग आणि पदे खालीलप्रमाणे :-

१) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (Senior Social Welfare Inspector) :- एकूण पदे-५

२) समाज कल्याण निरीक्षक (Social Welfare Inspector) :- एकूण पदे-३९

३) गृहपाल / अधिक्षक (Warden) (महिला) :- एकूण ९२ पदे

४) गृहपाल / अधिक्षक (Warden) (सर्वसाधारण) :- एकूण ६१ पदे

५) उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Steno) :- एकूण पदे १०

६) निम्नश्रेणी लघुलेखक (Lower Grade Steno) :- एकूण पदे ३

७) लघु टंकलेखक (Steno Typist) :- एकूण पदे ९

१. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी

१) जाहिरातीत नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

२) पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

३) प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे (महिला, खेळाडू, माजीसैनिक, दिव्यांग व्यक्ती, अनाथ) उपलब्ध नाहीत. तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच जाहिरातीत नमूद नसलेल्या मागासप्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता पचे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

४) महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग तसेच अनाथांसाठीचे समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात्त वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.

● वेतनश्रेणी :-

अ. क्र पदांचे नाव वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्तर

१) उच्चश्रेणी लघुलेखक :- S-१६ : ४४९०० – १४२४००

२) गृहपाल / अधिक्षक (महिला) :- S-१४ : ३८६०० – १२२८००

३) गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) :- S-१४ : ३८६०० – १२२८००

४) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक :- S-१४ : ३८६०० – १२२८००

५) निम्नश्रेणी लघुलेखक :- S-१५ : ४१८०० – १३२३००

६) समाज कल्याण निरीक्षक :- S-१३ : ३५४०० – ११२४००

७) लघुटंकलेखक :- S-८ : २५५०० – ८११००

● वयोमर्यादा (वयोमर्यादा गणण्याचा दिनांक दि. ३१.१०.२०२४) :- see below chart

● शैक्षणिक अर्हता :-

१) गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) / गृहपाल / अधिक्षक (महिला) :- अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किया महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयात प्राधान्य क महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक :- अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलवास प्राधान्य 4 महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३) समाज कल्याण निरीक्षक :- अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

४) उच्चश्रेणी लघुलेखक :-
अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (SSC) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम,

ब) १. तच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडलाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किया
२. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण,

वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य

क) टंकलेखन (इंग्रजी ४०० शब्द प्रतिमिनिट) किंवा

ड) टंकलेखन (मराठी ३० शब्द प्रतिमिनिट)

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्जता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

५) निम्नश्रेणी लघुलेखक :- शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (SSC) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम,

ब) १. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किया
२. उच्थश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंढाळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, वरील ‘ब’ मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किया
क) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट
ड) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

६) लघुटंकलेखक :-
अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (SSC) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.

२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाबा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र

अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.

(३) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

(४) अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

(५) अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक १०.१०.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ११.११.२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील.

(६) ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल

परीक्षा शुल्काचा भरणा : १) परीक्षा शुल्क (फी):

● अ.क्र – प्रवर्ग – आवश्यक परीक्षा शुल्क

१) खुला प्रवर्ग रु.१०००/- (अक्षरी रु. एक हजार)

२) मागास प्रवर्ग :- रु.९००/- (अक्षरी रु. नऊशे )

● माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

● परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

● शासनाने ज्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्कात सवलत दिली आहे त्यांना ती अनुज्ञेय राहील. ५) उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील. ६) उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे

● Online अर्ज करण्यास सुरुवात : 10 ऑक्टोबर 2024

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 रोजी 11:55 PM पर्यंत

● परीक्षा अधिकृत संकेतस्थळ वर नंतर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्सः

● संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here

● Online अर्ज लिंक Apply Online

● अधिकृत संकेतस्थळ Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध”

Leave a Comment