● महाराष्ट्र राज्यातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क या पदांच्या एकूण 345 भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
● पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
● महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण 345 पदांच्या भरतीकरीता आय. बी. पी. एस. (Institute of banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती – 2023 घेण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
● विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.
पदनाम | पदे | वेतनश्रेणी |
पुरवठा निरीक्षक | 324 | S-10: 29,200-92,300 |
उच्चस्तर लिपिक | 21 | S-8: 25,500-81,100 |
अर्ज करण्याचा कालावधी | 13 ते 31 डिसेंबर 2023 |
अर्ज करण्याची लिंक | Click Here |
संपूर्ण जाहिरात | Download PDF |
परीक्षेचे स्वरूप / अभ्यासक्रम | Download Syllabus |
● अभ्यासक्रम :-
1) मराठी व्याकरण – 25 प्रश्न – 50 गुण
2) इंग्रजी व्याकरण – 25 प्रश्न – 50 गुण
3) सामान्य ज्ञान – 25 प्रश्न – 50 गुण
4) बौद्धिक चाचणी & अंकगणित – 25 प्रश्न – 50 गुण
● परीक्षेचा वेळ – 2 तास – 100 प्रश्न – 200 गुण
● प्रश्नपत्रिका स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी