डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन
● 1 डिसेंबर: जागतिक एड्स दिन
➤ दरवर्षी 1 डिसेंबर हा ‘जागतिक एड्स दिवस’ म्हणून साजरा केला जातो. एचआयव्ही/एड्सबद्दल जागरूकता वाढविणे, या आजारांमुळे प्राण गमावलेल्यांचे स्मरण करणे तसेच एचआयव्हीग्रस्त लोकांसोबत एकजूट दर्शविण्यासाठी हा दिन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करतो.
➤ 2023 सालची संकल्पनाः ‘समुदायांना नेतृत्व करू द्या !’ (Let Communities Lead!)
● 2 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन
➤ दरवर्षी 2 डिसेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन” (International Day for the Abolition of Slavery) साजरा केला जातो.
➤ हा दिन मानवी तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी, बळजबरीने विवाह यासह गुलामगिरीच्या समकालीन प्रकारांचे उच्चाटन करण्यासाठी समर्पित आहे.
➤ 2023 ची संकल्पना: “Fighting slavery’s legacy of racism through transformative education’
● 4 डिसेंबर : भारतीय नौदल दिन
➤ दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा भारतीय नौदल दिन हा भारतीय नौदलाच्या शौर्य, समर्पण आणि कर्तृत्वाचा सन्मान करणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे.
➤ 2023 ची संकल्पना: “Operational Efficiency. Readiness, and Mission Accomplishment in the Maritime Domain’
➤ 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या सामरिक आणि विजयी ऑपरेशन ट्रायडंटची आठवण म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे.
● 4 डिसेंबरः आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस
➤ जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्त्याच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी या दिनाचे आयोजन 4 डिसेंबर रोजी करण्यात येते.
● 5 डिसेंबरः जागतिक मृदा दिन
➤ दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जगभरातील लोक जागतिक मृदा दिन (World Soil Day) साजरा करतात.
➤ 2023 ची संकल्पनाः ‘माती आणि पाणी, जीवनाचा स्रोत’ (Soil and water, a source of life)
● 5 डिसेंबरः आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
➤ ‘आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन’ (International Volunteer Day) हा जगभरातील स्वयंसेवकांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवीं 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
➤ 2023 ची संकल्पना: “The Power of Collective Action: If Everyone Did
● 6 डिसेंबरः महापरिनिर्वाण दिन
➤ ‘महापरिनिर्वाण दिन’ हा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो दरवर्षी 6 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येतो.
➤ डॉ. आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिली येथे महापरिनिर्वाण म्हणजेच निधन झाले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले.
● 7 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन
➤ 1944 मध्ये 7 डिसेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटने’ची (ICAO) स्थापना झाली. या संस्थेचा स्थापना दिवस ‘आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिल (International Civil Aviation Day) साजरा केला जातो.
➤ 2023 ची संकल्पनाः ‘अॅडव्हान्सिंग इनोजेस्र फॉर ग्लोबल एव्हिएशन डेव्हलपमेंट’
● 7 डिसेंबरः सशस्त्र सेना ध्वज दिवस
➤ दरवर्षी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा केला करण्यात येतो.
➤ संरक्षण मंत्रालयाने 28 ऑगस्ट 1949 रोजी स्थापन केलेल्या या दिनाचे आयोजन गणवेशातील शूर स्त्री- पुरुषांचा सन्मान करण्यासाठी केले जाते.
● 8 डिसेंबरः सार्क चार्टर दिन
➤ दरवर्षी 8 डिसेंबर हा दिवस ‘सार्क चार्टर डे’ (SAARC Charter Day) म्हणून साजरा केला जातो.
➤ 1985 मध्ये ढाका येथे झालेल्या सार्क परिषदेत सार्क चार्टर / सनदेवर स्वाक्षरी झाल्याच्या स्मरणार्थ या दिनाचे आयोजन करण्यात येते.
➤ सार्क म्हणजेच साउथ एशियन असोसिएशन फारे रीजनल कोऑपरेशन (SAARC) ही दक्षिण आशियातील देशांची प्रादेशिक आंतरशासकीय संघटना आणि भू- राजकीय संघटना आहे. 8 डिसेंबर 1985 रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. तिचे मुख्यालय नेपाळमधीत काठमांडू येथे आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका है। देश या संघटनेचे सदस्य आहेत.
● 9 डिसेंबरः आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस
➤ दरवर्षी 9 डिसेंबर हा दिवस आल भ्रष्टाचारविरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
● 9 डिसेंबरः नरसंहाराच्या गुन्ह्यातील बळींचा तरराष्ट्रीय स्मृती आणि सन्मान दिन
➤ दरवर्षी 9 डिसेंबर हा दिवस ‘नरसंहाराच्या तील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मृती आणि सन्मान दिन’ termational Agnity Of The Victims Of The Crime Of Genocide) म्हणून पाळण्यात येतो.
● ‘जिनोसाईड कन्व्हेन्शन’ स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दिनाचे आयोजन करण्यात येते.
■ 10 डिसेंबरः मानवी हक्क दिवस
➤ 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या दासभेने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला.
➤ परिवर्तनकारी घटनेच्या स्मरणार्थ ‘मानवी हक्क दिना’चे Human Rights Day) आयोजन करण्यात येते.
➤ 2023 साली या घटनेचा 75 वा वर्धापन दिन आहे.
➤ 2023 ची संकल्पनाः ‘सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय’ (Freedom, Equality and Justice for All)
■ 11 डिसेंबरः आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
➤ दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आपल्या जीवनातील विंतांच्या महत्वाची आठवण करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ (World Mountains Day) साजरा केला जातो.
➤ 2023 ची संकल्पना: “Restoring Mountain Ecosystems
➤ दरवर्षीं 12 डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कल्होज (UHC) दिवस साजरा केला जातो.
● 12 डिसेंबर: युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे
➤ 2023 ची संकल्पना: “Health For All: Time for Action’
● 12 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस
➤ आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस (International Day Of Neutrality) दरवर्षी 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
● 14 डिसेंबरः राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
➤ ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भारतात दरवर्षी 14 डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस’ (National Energy Conservation Day) साजरा केला जातो.
➤ व्यक्ती, समुदाय, व्यवसाय, संस्था आणि सरकार यांच्यासाठी विविध ऊर्जा कार्यक्षम पद्धतींचा स्वीकार करून ऊर्जा संवर्धन करण्यासाठी हा दिन समर्पित आहे.