चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 39 | Current Affairs Special Test 39

Current Affairs Special Test 39
Current Affairs Special Test 39

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 38 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

Click Here to Join Whatsapp Group

Click Here to Join Telegram Channel

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
948
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 39 | Current Affairs Special Test 39

1 / 10

जागतिक भूक दिन दरवर्षी —- रोजी जागतिक भूक दिन साजरा केला जातो.

2 / 10

भारतीय सैन्यदलातील मेजर —– यांची 2023 च्या संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

3 / 10

—– यांनी स्वतःला मागे टाकत 30 व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले.

4 / 10

Gail इंडिया Ltd. ने —– राज्यात 10MW चा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट सूरू केला आहे.

5 / 10

DRDO चे प्रमुख —- यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने एक वर्षांनी वाढवला आहे.

6 / 10

—- सचिव पदी प्रदीप कुमार त्रिपाठी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

7 / 10

‘आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट डे’ दरवर्षी —- रोजी साजरा केला जातो.

8 / 10

—- च्या चेअरमन पदी राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली ?

9 / 10

भारतीय गिर्यारोहक —- हे एकाच मोसमात दोनदा एव्हरेस्ट आणि माऊंट ल्होत्से सर करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत.

10 / 10

नुकतीच कोणाची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे ?

Your score is

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  

Test 38 Click Here
Test 37 Click Here
Test 36 Click Here
Test 35 Click Here

● स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या चेअरमन पदी राकेश रंजन यांची नियुक्ती

स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या चेअरमन पदी नियुक्ती झालेले राकेश रंजन हे मणिपूर कॅडर चे 1992 बॅच चे आयएएस अधिकारी आहेत.

Gail इंडिया Ltd. ने मध्य प्रदेश राज्यात 10MW चा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट सूरू केला आहे.

लोकपाल सचिव पदी प्रदीप कुमार त्रिपाठी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिनाचे 2024 हे 76 वे वर्षे आहे.

नाटो संघटनेच्या 6 सदस्य देशांनी रशिया देशाविरुद्ध सीमा संरक्षणासाठी ड्रोन भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले 329 (B) हे कलम निवडणूक आयोगा संबंधित आहे.

जगातील मोठ्या मालवाहू जहाजामधे गणना होणारे MSC ANA हे जहाज गुजरात या राज्याच्या मुंद्रा बंदरात दाखल झाले आहे.

● सातबाऱ्यावर आईचेही नाव दिसणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय !

राज्य सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

01 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे.

तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे.

राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

जागतिक भूक दिन :- 28 मे

भूकेच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी दरवर्षी 28 मे रोजी जागतिक भूक दिन साजरा केला जातो.

जागतिक भूक दिन 2024 ची थीम ‘संपन्न माता. भरभराटीचे जग” ही आहे.

उद्देश :- “लाखो लोक ज्यांना योग्य पोषण मिळत नाही अशा संघर्षांबद्दल जागरूकता निर्माण करणे”

जागतिक भूक दिनाची स्थापना प्रथम 2011 मध्ये द हंगर प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे करण्यात आली, जी जागतिक भूक संपवण्यासाठी वचनबद्ध आहे.

28 मे रोजीचे इतर दिनविशेष :-

मासिक पाळी स्वच्छता दिवस

महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन

● पीएसजीने जिंकला फ्रेंच चषक

जर्मनने ल्योनवर 2-1 असा विजय मिळवून फ्रेंच चषकावर मोहोर उमटवली.

पीएसजीकडून खेळत असलेल्या अखेरच्या सामन्यात एम्बाप्पेला एकही गोल करता आला नाही.

एम्बाप्पेने पीएसजीसाठी 308 सामने खेळले. यात त्याने विक्रमी 256 गोल केले आहेत.

अंतिम सामन्यात पीएसजीकडून ओसमान डेम्बेलेआणि फॅबियन रुईझ यांनी पहिल्या हाफमध्ये गोल केले, तर लियॉनसाठी एकमेव गोल जॅक ओब्रायनने केला.

● लेव्हरकुसेनने जिंकला जर्मन कप

जर्मन कप फायनलमध्ये लेव्हरकुसेनने कैसरस्लॉटर्नचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

प्रथमच बुंदेसलिगा जिंकणाऱ्या बायरचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे.

प्रशिक्षक झाबी अलोन्सोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बायरसाठी ग्रॅनिट झाकाने एकमेव गोल केला.

बायरने या मोसमात घरच्या मैदानावर एकही सामना गमावला नाही. मायदेशात आणि युरोपमधील सर्व स्पर्धांमध्ये त्याने एकूण 53 सामने खेळले, त्यात त्यांचा एकमेव पराभव अटलांटाकडून झाला.

● बार्सिलोनाच्या महिला यूईएफए महिला चॅम्पियन्स

लियॉनच्या महिलांना यूईएफए महिला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत बार्सिलोनाकडून पराभव स्वीकारावा लागला.

बार्सिलोनाने लियॉनचा पराभव करून गेल्या चार हंगामात तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले.

जगातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐताना बोनामतीने उत्तरार्धात बार्सिलोनासाठी गोल केला.

● रोनाल्डोचा सर्वाधिक गोलचा विक्रम

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी प्रो लीग फुटबॉल स्पर्धेत (अल नासर संघाकडून) सत्राचा शेवट सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमासह केला. या विक्रमासह लीगमधील त्याच्या गोलची संख्या 35 झाली आहे

अल हिलालने अखेरच्या साखळी सामन्यात अल वेहदा संघाला 2-1 असे पराभूत केले.

अल नासर संघ स्थानिक दावेदार अल हिलालपेक्षा 14 गुणांनी पिछाडीवर असून अल नासर संघ 82 गुणांसह लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

● नेपाळच्या कामी रीता शेर्पा यांनी 30 व्यांदा केले एव्हरेस्ट शिखर सर

नेपाळच्या कामी रीता शेर्पा यांनी स्वतःला मागे टाकत 30 व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले.

कामी रीता शेर्पा यांनी सेव्हन समिट ट्रेक्स एव्हरेस्ट मोहीम 2023 चा भाग म्हणून 29 व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले होते.

13 मे 1994 साली वयाच्या 24 व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले होते.

1994 ते 2024 या कालावधीत कामी रीता शेर्पा यांनी तब्बल 30 वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment