मनोज सोनी यांनी UPSC चे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून स्विकारली सूत्रे.

Photo credit to https://www.newsdrum.in

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ असलेले मनोज सोनी यांनी 16 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या स्मिता नागराज यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.

सोनी यांनी जून 2017 पासून यूपीएससीचे सदस्य म्हणून निवड झाली होती.

एप्रिल 2022 पासूनच ते UPSC चे हंगामी  अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडत होते, आता 16 मे 2023 रोजी त्यांच्याकडे अधिकृतपणे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली.

मनोज सोनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ तसेच द महाराजा सयाजीराव विद्यापीठ येथे कलगुरू म्हणून काम पाहिलेले आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment