PDCC Bank Bharti Hall Ticket | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉलतिकीट उपलब्ध

PDCC Bank Bharti Hall Ticket | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉलतिकीट उपलब्ध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, पुणे बँकेच्या लेखनिक पदासाठी दि.०७/०८/२०२१ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून दि.०७/०८/२०२१ ते दि. १७/०८/२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी पात्र उमेदवारांना सुचित करण्यात येते की, सदर प्रलंबित लेखनिक पदाची भरती प्रक्रिया ज्या टप्यावर प्रलंबित झालेली होती त्या टप्यावर पुढे सुरू करण्यात येत आहे.

सदर सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्वाच्या सुचना, ऑनलाईन परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी व प्रक्रियाबाबतच्या लिंक (https://pdccbank.co.in/careers /https://pdccb.recruitlive.in) बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल करतांना नमूद केलेल्या ई-मेल आय.डी. वर सद भरती प्रक्रिये संदर्भातील लिंक सोमवार, दि. १४/०८/२०२५ रोजी पाठविण्यात येणार आहे.

बँकेच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या/येणाऱ्या सुचनांचे अवलोकन व पालन करून उमेदवारांनी पुढील सर्व प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी. बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.

आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेली सूचना खालीलप्रमाणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे बँकेच्या लेखनिक पदासाठी दि.०७/०८/२०२१ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून दि.०७/०८/२०२१ ते दि. १७/०८/२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना सुचित करण्यात येते की, बँकेच्या लेखनिक पदाची ऑनलाईन परीक्षा दि. २२/०८/२०२५ ते दि. २५/०८/२०२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र https://pdccb.recruitlive.in या संकेतस्थावर दि. १४/०८/२०२५ रोजीपासून उमेदवाराच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल.

बँकेच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या/येणाऱ्या सुचनांचे अवलोकन व पालन करून उमेदवारांनी पुढील सर्व प्रक्रिया पुर्ण करावी. बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 14 ऑगस्ट 2025 रोजी उपलब्ध होणार आहे..

PDCC बँक हॉलतिकीट Download लिंक Click Here
(Available from 14 August)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment