Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांची भरती
सरळसेवेच्या कोटयातुन गट ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड या संवर्गातील भरती करावयाची पदे
पदाचे नाव – सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी
१) संरक्षण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)
२) परिविक्षा अधिकारी, गट क – (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)
३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१६:४४९००-१४२४००)
४) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क (वेतनश्रेणी S-८: २५५००-८११००)
५) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क (वेतनश्रेणी S-६: १९९००-६३२००)
६) लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१५:४१८००-१३२३००)
७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)
८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-१: १५०००-४७६००)
९) स्वयंपाकी गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)
● शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी व अनुभव :
जाहिराती मध्ये नमूद पदांकरीता अर्ज करण्यासाठी दिनांक ०३-११-२०२४ रोजी पूढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव पुर्णतः धारण करणे अनिवार्य आहे. (See Below Chart)
● वयोमर्यादा :- जाहिराती मध्ये नमूद पदांकरीता अर्ज करण्यासाठी दिनांक ०३-११-२०२४ रोजी उमेदवाराच्या वयाची गणना करण्यात येईल. (See Below Chart)
● ऑनलाईन परिक्षेचे स्वरुप
१) संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यांत येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका हया मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरुपाच्या घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यांत आलेले आहेत.
२) ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based Examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुणांची या प्रमाणे एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिर्म१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दि.४ मे, २०२२ मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.
३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क, लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क, स्वयंपाकी, गट-क या पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व तदनंतर व ८० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. १२० गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ३० गुणांची या प्रमाणे एकूण १२० गुणांची संगणक आधारीत परीक्षा घेण्यात येईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायीक चाचणी साठी पात्र राहतील. लेखी परीक्षा व व्यावसायीक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्तीकरीता शिफारस करण्यात येईल. व्यावसायीक चाचणी करीता निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राखून ठेवले आहेत.
४) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रनिमं१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दि. ०४ मे, २०२२ मधील तरतुदीनुसार उक्त नमुद पर्दाकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यांत येणार नाहीत.
५) उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी तसेच ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.
६) परीक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यांत येणार आहे. विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यांत येऊन त्याचे सामान्यीकरण/समतूल्य करण्याबाबत (Normalization) संबधीत कंपनीकडून देण्यांत आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल. सदर (Normalization) गुणांकन पध्दत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.
७) उमेदवारास एका पेक्षा अधिक पदासाठी संवर्गासाठी अर्ज करावयाचा झाल्यास प्रत्येक पदासाठी संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.
८) चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.
● संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
अ. क्र. पदनाम/संवर्ग – परीक्षेचे गुण – वेळ
१) संरक्षण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) – ऑनलाईन परीक्षा 200 गुण – वेळ 120 मिनिटे
२) परिविक्षा अधिकारी, गट-क – ऑनलाईन परीक्षा 200 गुण – वेळ 120 मिनिटे
३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क – ऑनलाईन परीक्षा 120 गुण – व्यावसायिक चाचणी 80 गुण – एकूण गुण 200 – वेळ 90 मिनिटे
४) वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क – ऑनलाईन परीक्षा 200 गुण – वेळ 120 मिनिटे
५) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क – ऑनलाईन परीक्षा 200 गुण – वेळ 120 मिनिटे
६) लघुलेखक (निम्मश्रेणी), गट-क – ऑनलाईन परीक्षा 120 गुण – व्यावसायिक चाचणी 80 गुण – एकूण गुण 200 – वेळ 90 मिनिटे
७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड – ऑनलाईन परीक्षा 200 गुण – वेळ 120 मिनिटे
८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड – ऑनलाईन परीक्षा 200 गुण – वेळ 120 मिनिटे
९) स्वयंपाकी, गट-ड – ऑनलाईन परीक्षा 120 गुण – व्यावसायिक चाचणी 80 गुण – एकूण गुण 200 – वेळ 90 मिनिटे
परीक्षा शुल्काचा भरणा : १) परीक्षा शुल्क (फी):
अ.क्र – प्रवर्ग – आवश्यक परीक्षा शुल्क
१) खुला प्रवर्ग रु.१०००/-
२) मागास प्रवर्ग :- रु.९००/- (१० % सूट)
३) परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
● Online अर्ज करण्यास सुरुवात : १४ ऑक्टोबर २०२४
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी ११:५५ PM पर्यंत
● परीक्षा अधिकृत संकेतस्थळ वर नंतर कळविण्यात येईल.
● महत्वाच्या लिंक्सः
● संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here
● Online अर्ज लिंक Apply Online
● अधिकृत संकेतस्थळ Click Here
● Age Calculator
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
2 thoughts on “Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांची भरती”