21 एप्रिल चालू घडामोडी नोट्स
● व्हाईस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे देशाचे नवे नौदल प्रमुख.
सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर दिनेश कुमार त्रिपाठी नवीन पदभार स्वीकारतील. व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी, सैनिक स्कूल, रेवाचे माजी विद्यार्थी, सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अॅडमिरल कुमार जेव्हा पद सोडतील, तेव्हा त्रिपाठी हे नौदलातील सर्वात वरिष्ठ अधिकारी असतील. नौदलातील सर्वोच्च पदावर त्यांची नियुक्ती करताना सरकारने ज्येष्ठता आदेशाचे पालन केले आहे. सध्या कार्मिक प्रमुख म्हणून कार्यरत असलेले व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांना नौदलाचे पुढील उपप्रमुख बनवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
● 21 एप्रिल – नागरी सेवा दिन
21 एप्रिल 1947 रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या अधिकाऱ्यांच्या प्रोबेशनर्सना संबोधित केले त्या दिवसाच्या स्मरणार्थ ही तारीख निवडली जाते, त्यांनी नागरी सेवकांना ‘भारताची स्टील फ्रेम’ म्हणून संबोधित केले होते.
सध्या 3 अखिल भारतीय सेवा आहेत त्या पुढीलप्रमाणे IAS, IPS, IFS
केंद्रीय सेवा :- यात गट अ व गट ब मधील सुमारे 17 सेवा येतात.
● टाईम मासिकाची जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध
अभिनेत्री आलिया भट्ट, कुस्तीपटू साक्षी मलिक, सत्या नडेला – मायक्रोसॉफ्टचे सीईओ & देव पटेल – अभिनेता-दिग्दर्शक, अजय बंगा – जागतिक बँकेचे अध्यक्ष, (अजय बंगा यांचा जन्म पुण्यात झाला, त्यांनी अहमदाबादमधून एमबीए केले.) तसेच जिगर शाह – अमेरिकेच्या ऊर्जा कर्ज कार्यक्रम कार्यालयाचे संचालक, प्रियमवदा नटराजन – येल विद्यापीठातील खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, अस्मा खान – भारतीय वंशाच्या रेस्टॉरंटच्या मालक यांना देखील या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.
● AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण निश्चितीसाठी उच्चाधिकार समिती नियुक्त
भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली एआय धोरण निश्चितीसाठी उच्चाधिकार समिती नियुक्त केली आहे. यात विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, नॅसकॉमसारखी उद्योजकांची संघटना, तसेच इंडियन सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या थिंक टँकमधील तज्ज्ञांचा यात समावेश केला आहे. एआय धोरणाचे जवळपास 70 पेक्षा अधिक मसुदे तयार केले आहेत. संबंधित सर्व घटकांशी याबाबत चर्चा केली जाणार आहे.
● ‘वर्ल्ड प्रेस फोटो अॅवॉर्ड ऑफ द इयर’
इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या 5 वर्षीय भाची सॅलीच्या मृतदेहाला मिठी मारताना पॅलेस्टिनी महिला इनास अबू मामार (36) हीच फोटो. 17 ऑक्टोबर 2023 ला दक्षिण गाझापट्टीतील खान युनूसमधील नासेर रुग्णालयात रॉयटर्स वृत्तसंस्थेचे मोहम्मद सालेम या छायाचित्रकाराने इनास मामार यांचे हे दुःखावेगाचे छायाचित्र टिपले. सत्तांधांना अशा अश्रूशी काहीच देणेघेणे नसते. त्यांना हवा असतो तो फक्त विजय. मग त्यासाठी अशी हजारो निष्पाप मुले पायाखाली तुडवली गेली तरी बेहत्तर. सालेम यांनी काढलेल्या या छायाचित्राला ‘वर्ल्ड प्रेस फोटो अॅवॉर्ड ऑफ द इयर’ मिळाला आहे.
● ‘कान्स’ फेस्टिव्हलमध्ये ‘द शेमलेस’ची निवड
जागतिक स्तरावर प्रतिष्ठित असलेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सव 2024’ मध्ये मराठमोळ्या रोहित कोकाटे याची भूमिका असलेला ‘द शेमलेस’ हा चित्रपट निवडला गेला आहे. ‘अनसर्टन रिगाई’ या विभागात निवड झाली असून, 14 मे ते 25 मे दरम्यान कान्स चित्रपट महोत्सव पार पडेल. रोमॅटिक ड्रामा असलेल्या कॉन्स्टेंटिन बोजानोव्ह दिग्दर्शित ‘द शेमलेस’ ह्या चित्रपटाची निवड झाली आहे.
● भारताचा नौकानयनपटू बलराज पन्वर पॅरिस ऑलम्पिक साठी पात्र
● चालपटू (Race Walkers) अक्षदीप सिंह, प्रियांका गोस्वामी यांनी देखील मिळवला ऑलम्पिक कोटा
● विनेश फोगट, रितिका, अंशू मलिक यांनी मिळवला पॅरिस ऑलम्पिकचा कोटा.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने शनिवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनीगटात तसेच, अंशू मलिक (57 किलो) आणि 23 वर्षांखालील जगज्जेती रीतिका (76 किलो) यांनीही शानदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. भारताने आता पॅरिस ऑलिम्पिकचे 4 कोटे मिळवले आहेत. अंतिम पंघाल हिने याआधी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकत 53 किलो वजनीगटात कोटा मिळवला.