8 जानेवारी दिनविशेष | 8 January DinVishesh | 8 January Important Facts

8 जानेवारी – घटना

1835: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

1880: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

1889: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत
गणकयंत्राचे पेटंट मिळाले.

1940: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.

1947: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.

1957: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.

1963: लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.

2000: लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

2001: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

8 जानेवारी – जन्म

1909: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म.

1924: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 2000)

1925: हिंदी नाटककार राकेश मोहन यांचा जन्म. (मृत्यू: 5 डिसेंबर 1973)

1926: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 2004)

1929: अभिनेता सईद जाफरी यांचा जन्म.

1935: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 1977)

1936: परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्योतिंद्रनाथ दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: 3 जानेवारी 2005)

1939: अभिनेत्री नंदा यांचा जन्म.

1942: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक स्टिफन हॉकिंग यांचा जन्म.

1945: मराठी लेखिका प्रभा गणोरकर यांचा जन्म.

8 जानेवारी – मृत्यू

1642: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचे निधन. (जन्म: 15 फेब्रुवारी 1564)

1825: कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक एली व्हिटनी यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1765)

1884: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1838)

1941: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1857)

1966: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1909)

1967: प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचे निधन. (जन्म: 10 डिसेंबर 1880 – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)

1973: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे निधन.

1973: तत्वज्ञ आणि विचारवंत स. ज. भागवत यांचे निधन.

1976: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचे निधन. (जन्म: 5 मार्च 1898)

1984: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.

1992: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.

1994: 68वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.

1995: समाजवादी विचारवंत मधु लिमये यांचे निधन. (जन्म: 1 मे 1922)

1996: फ्रान्सचे 21वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचे निधन. (जन्म: 26 ऑक्टोबर 1916)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment