वनलायनर चालू घडामोडी नोट्स | Oneliner Current Affairs Notes |18 नोव्हेंबर 2023

भारतीय नौदलाच्या सागरी नौकानयन स्पर्धेचं 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान आयोजन
भारतीय नौदल सेलिंग असोसिएशनच्या वतीनं कोची ते गोवा दरम्यान आंतरविभागीय सागरी नौकानयन स्पर्धा येत्या 22 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत नौदलाच्या वतीनं बुलबुल, नीलकंठ, कडलपुरा आणि हरियाल या चाळीस फूटी नौका सहभागी होतील. यावेळी  स्पर्धेत कोची ते गोवा 360 सागरी मैल अंतर नौका पाच दिवसात पूर्ण करतील. यात 8 महिला अधिकारी अग्निवीरांसह 32 कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या धाडसी स्पर्धेमुळे नौदलाच्या कर्मचाऱ्यांमधील साहसी भावना आणि क्रूची जोखीम व्यवस्थापन क्षमता वाढेल. 

G-20 नेत्यांची शिखर परिषद दूरदृष्यप्रणालीद्वारे येत्या 22 नोव्हेंबरला
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या 22 नोव्हेंबरला होणा-या G-20 नेत्यांच्या  शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. भारताच्या G-20 अध्यक्षपद कालावधी समाप्तीपूर्वी भारत एक शिखर परिषद दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित करेल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या G-20 शिखर परिषदेच्या समारोप सत्रादरम्यान जाहीर केले होते. या परिषदेला आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांसह सर्व G-20 सदस्यांच्या नेत्यांना तसंच 9 अतिथी देश आणि 11 आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आभासी परिषद नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेमधील निर्णय आणि अंमलबजवणीचे मुद्दे तसेच तेव्हापासूनच्या घडामोडींचा आढावा घेण्यात येणार आहे. भारताचा G-20 अध्यक्षपदाचा कालावधी 30 नोव्हेंबरला संपणार आहे. 2024 मध्ये ब्राझीलच्या G-20 अध्यक्षपदाच्या G-20 ट्रोइकामध्ये भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असेल. 

डॉ. मोहमद मुइझू मालदीवचे 8 वे राष्ट्राध्यक्ष
मालदीवचे 8 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉ. मोहमद मुइझू यांचा शपथविधी राजधानी मालेच्या रिपब्लिक स्क्वेअर येथे काल पार पडला. मोहमद लतीफ यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. मालदीवचे सरन्यायाधीश अहमद मुथासिम अदनान यांनी या दोघांना शपथ दिली. सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. मुइझू यांनी मोहमद सोलिह यांचा पराभव केला होता. डॉ. भारताचे केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री किरेन रिजिजू या शपथग्रहण सोहोळ्याला उपस्थित होते.

● RBI चे माजी गर्वनर एस. वेंकटरमणन यांचे निधन
RBI चे माजी गर्वनर एस. वेंकटरमणन यांचे आज दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. ते रिझर्व बँकेचे 18 वे गर्वनर होते. कर्नाटक राज्य सरकारच्या तसंच केंद्रसरकारच्या अर्थ विभागात त्यांनी सचिवपदावर काम केलं होते. त्यांच्या कार्यकाळात RBI ने IMF च्या चलन  स्थिरीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि इतर आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू केले.

केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 27 कंपन्या हार्डवेअर उत्पादनात 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार
उत्पादन प्रोत्साहन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 27 कंपन्या हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात सुमारे 3 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. यापैकी 23 कंपन्या सर्व्हर्स, लॅपटॉप आणि टॅब्लेट्सचं उत्पादन करण्यास लगेचच, तर इतर वस्तूंच्या उत्पादनासही पुढच्या 90 दिवसांमध्ये सुरुवात करतील.यामुळे रोजगाराच्या जवळपास 2 लाख संधी उपलब्ध होतील.

उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथं सिलक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या 40 कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. पंतप्रधान कार्यालय या कामावर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि राज्य सरकारशी संपर्कात आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment