7 जानेवारी दिनविशेष | 7 January DinVishesh | 7 January Important Facts

7 जानेवारी – घटना

1610: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

1680: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

1789: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.

1922: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन 18 महिन्यांची शिक्षा झाली.

1927: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

1935: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.

1959: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

1968: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.

1972: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

1978: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका 69 कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.

7 जानेवारी – जन्म

1893: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (मृत्यू: 21 मे 1979)

1920: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2008)

1921: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: 20 जून 2008)

1925: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.

1948: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.

1961: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.

1979: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

7 जानेवारी – मृत्यू

1989: दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: 29 एप्रिल 1901)

2000: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment