23 जानेवारी दिनविशेष | 23 January DinVishesh | 23 January Important Facts

23 जानेवारी : घटना

1565: विजयनगर साम्राज्याची अखेर.

1708: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

1849: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या God’s पदवीधर बनल्या. #1st

1932: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.

1943: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.

1968: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.

1973: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.

1997: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.

2002: वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण.

23 जानेवारी – जन्म

1814: भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1893)

1897: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1945 – फोर्मोसा, तैवान)

1898: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1956)

1915 : उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म. (मृत्यू: 1 मे 1972)

1920: व्यासंगी लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म.

1926: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 2012)

1934: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1864)

1947: इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मेगावती सुकार्नोपुत्री यांचा जन्म.

23 जानेवारी – मृत्यू

1664: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन. (जन्म: 18 मार्च 1594)

1919: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन. (जन्म: 26 मे 1885)

1931: द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1881)

1959: शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन.

1989: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचे निधन. (जन्म: 11 मे 1904)

1992: भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.

2010: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 1927)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment