21 जानेवारी दिनविशेष | 21 January DinVishesh | 21 January Important Facts

21 जानेवारी – घटना

1761: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

1793: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा 16 वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

1805: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

1846: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.

1961: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.

1972: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

2000: फायर अँड फरगेट या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

21 जानेवारी – जन्म

1882: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1943)

1894: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. (मृत्यू: 29 नोव्हेंबर 1939)

1910: गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1975)

1924: माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म. (मृत्यू: 12 नोव्हेंबर 2005)

1953: मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक पॉल अ‍ॅलन यांचा जन्म.

21 जानेवारी – मृत्यू

1793: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन. (जन्म: 23 ऑगस्ट 1754)

1901: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचे निधन. (जन्म: 2 ऑगस्ट 1835)

1924: रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1870)

1943: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: 23 मार्च 1923)

1945: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. (जन्म: 25 मे 1886)

1950: इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन. (जन्म: 25 जून 1903)

1959: दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1881)

1965: अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.

1998: भारताचे 9 वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: 21 जून 1916)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment