ISRO ने आज (2 एप्रिल) कर्नाटकातल्या चित्रदुर्ग येथे पुनर्वापर करता येणाऱ्या उपग्रह प्रक्षेपकाच्या ऑटोनॉमस लँडिंग मिशनची यशस्वी चाचणी केली.
भोपाळ येथे संयुक्त कमांडर परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी देशाच्या सशस्त्र दलाच्या सज्जतेचा घेतला आढावा
भारतात प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण. भारतात 1 एप्रिल 1973 रोजी प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. सध्या देशात 53 व्याघ्रप्रकल्प असून जगभरातल्या वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ त्यामध्ये आहेत 2018 च्या व्याघ्र गणनेनुसार एकूण 2967 वाघ आहेत.
ग्लोबल टायगर फोरमतर्फे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला – कंझर्वेशन अॅश्युअर्ड टायगर स्टैंडर्ड म्हणजेच CATS या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाने सुरू केलेली महिला सन्मान बचत योजना आजपासून ( 2 एप्रिल ) अंमलात येत आहे. या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा राहणार असून त्यासाठी आकर्षक आणि निश्चित असा 7.5 % व्याजदर गुंतवणूकदारांना योजना देशभरातल्या सर्व 1 लाख 59 हजार डाक कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे. या योजनेमध्ये कमाल 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. 31 मार्च 2005 पर्यंत ही योजना सुरू असणार आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी भारतातर्फे 29 कसोटी मध्ये 75 बळी घेतले होते 177 धावा देऊन 10 बळी घेण्याचा त्यांचा विक्रम होता.
देशभरात विविध ठिकाणी IIFL जितो अहिंसा रन्स चे आयोजन करण्यात आले. विक्रमी संख्येने लोक सहभागी झाल्यामुळे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे पथश्री रास्ताश्री नावाच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली.
माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या PV सिंधूची महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक.
भारताचे G-20 अध्यक्षतेअंतर्गत देशभरात विविध बैठकांचे आयोजन. गांधी नगर येथे आजपासून (2 एप्रिल) दुसरी ऊर्जा रूपांतरण कार्यकारी गटाची 3 दिवसीय बैठक सुरू झाली. त्याचबरोबर सिलिगुडी येथे G-20 च्या पर्यटन कार्यसमूहाच्या बैठकीला सुरुवात झाली.