
महाराष्ट्र राज्याचा 63 व्या वर्धापन दिन आज 1 मे रोजी राज्यभर साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी स्थापना करण्यात आली होती.
महाराष्ट्र दिनापासून मुंबईच्या मेट्रो रेल्वेतून ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना तसेच विद्यार्थ्यांना प्रवासात 25 टक्के सवलत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे.
राज्य सरकार तर्फे येत्या एक आणि दोन जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
संघर्षग्रस्त सुदाम मधून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबविण्यात येत आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत सुमारे 1600 भारत यांची सुटका करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या जनतेशी संवाद साधणाऱ्या लोकप्रिय कार्यक्रमाचा ऐतिहासिक 100 वा भाग काल 30 एप्रिल रोजी प्रसारित झाला.
ST च्या ई शिवनेरी बसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज (1 मे रोजी) लोकार्पण आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाचा आरंभ करण्यात आला.
राज्यभरातल्या 317 आपला दवाखान्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. सवलतीच्या दरातल्या वाळू विक्री केंद्रांनाही आजपासून सुरू झाली.
नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यात GST ने एक लाख 87 हजार कोटी रुपये कर संकलन केले आहे. हा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक ठरला आहे.
बॅडमिंटन आशिया चषक अजिंक्यपद स्पर्धेत 58 वर्षानंतर पदक मिळवत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीची ऐतिहासिक कामगिरी. त्यांनी पुरुष दुहेरीत पटकावले सुवर्णपदक.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होत आहे. या प्रकल्पास स्थानिकांचा विरोध होत आहे.