तलाठी भरती 2023 सुधारित मागणीपत्रक

● महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट- क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती  जाहिरातीत मुद्दा क्र. ४.१ व ४.३ नुसार पदभरतीचे पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल (कमी/ वाढ) होण्याची शक्यता असले बाबत नमूद करणेत आलेले आहे.

● तसेच जाहिरातीमधील परिशिष्ठ -१ मध्ये तलाठी पदभरती करिता जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील नमूद करणेत आलेला आहे. तसेच या कार्यालयाकडील दि. २४/७/२०२३ अन्वये गडचिरोली व पालघर जिल्हयाचे सुधारित मागणीपत्रक प्रसिध्द करणेत आलेले आहे.

● तथापि, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील पत्र क्र. तलाठी २०२२/ प्र.क्र१९०/ई-१० दि. २८ जून २०२३ अन्वये अनुकंपाची पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याने तसेच अतिरिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांचेकडून अनुकंपाची पदे भरणेत आल्याने बिंदुनामावली प्रमाणे फेरआढावा घेऊन जिल्हाधिकारी यांचेकडून सुधारित मागणीपत्रक सादर करणेच्या सूचना देणेत आलेल्या होत्या.

● याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडून सुधारित मागणीपत्रके प्राप्त झालेली असून राज्यभरात भरावयांच्या पदांमध्ये एकुण १४९ ने वाढ होत आहे. सुधारित मागणीपत्रकानुसार प्राप्त झालेली व अतिरिक्तपदे भरण्यास शासनकडून मान्यता देणेत आलेली असल्याने जाहिरातीमधील प्रसिध्द परिशिष्ट १ मध्ये बदल होऊन भरावयाच्या एकूण पदांची संख्या ४७९३ इतकी होत आहेत. त्यानुसार सुधारित परिशिष्ट पुढील प्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे.

● अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पद भरतीबाबत मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल रिट याचिका क्र. SLP (C) No. 022109 2023 चे आदेशास अधिन राहून तसेच इतर न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या निर्णयास अधिन राहून सदरचे मागणीपत्रक प्रसिध्द करणेत येत आहे.

तलाठी सुधारित मागणीपत्रकDownload PDF149 जागावाढ

तलाठी जिल्हानिहाय आधीच्या जागा, नवीन जागा, जागांमधील फरक याचा तक्ता :-

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment