Talathi Bharti Selection List and Waiting List | तलाठी भरती निकाल जाहीर

Talathi Bharti Recruitment 2023

तलाठी भरती पुणे जिल्ह्याचे निवड यादी आणि प्रतिक्षा यादी झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेले प्रसिध्दीपत्रक खालीलप्रमाणे

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सरळसेवा पदभरती 2023 मधील दिनांक 18-08-2025 रोजी पदभरतीची 35 पदे रिक्त झालेली आहे. पदभरती 2023 चे पदभरतीचे सर्व पदे दिनांक 14-09-2025 अखेर भरणेबाबत महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण 2025/प्र.क्र.74/ई-10 दिनांक 07-05-2025 अन्वये निर्देश दिले आहे. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदभरती 2023 चे रिक्त झालेले 35 पदे भरणे आवश्यक असल्याने सदर उमेदवारांची निवडयादी व प्रतिक्षायादी या कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली आहे. उकत् निवड यादी व प्रतिक्षायादीतील ज्या उमेदवारांची यापूर्वी कागदपत्र पडताळणी झालेली नाही अशा उमेदवारांची दिनांक 21-08-2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, “अ” विंग 2, रा मजला, येथे कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे. सदर कागदपत्र तपासणीस जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांना सदर पदावर रुजु होण्याचे स्वारस्य नसलेचे गृहित धरुन प्रतिक्षायादीतील गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या उमदेवारांची निवड करुन त्यांना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदावर नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही करणेत येणार आहे.

सोबतच्या यादीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस कागदपत्राची यादी या सोबत जोडली आहे. सदर यादीतील मुद्दा क्र. 1 ते 23 मध्ये नमूद सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व 2 स्वसाक्षांकित झेरॉक्स् प्रती घेऊन उपस्थित रहावे.

पुणे तलाठी पदभरती – 2023 निवड & प्रतीक्षा यादी Click Here to Download PDF

तलाठी परीक्षेचे प्रथम Response Sheet दिनांक 28 सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले होती. प्रथम रिस्पॉन्स शीटवर उमेदवारांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2 वेळा अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आले.

आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी तलाठी परीक्षेची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षा दिनांक :
17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा घेण्यात आली.

तलाठी भरती अंतर्गत सुधारित गुणवत्ता यादी 11 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती.

तलाठी भरती निवड & प्रतिक्षा यादीDownload Selection & Waiting List

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment