तलाठी भरती जाहीर ; एकूण 4,625 पदे.

Talathi Bharti Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण 4,625 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे.

वेतनश्रेणी :-
S-8 : 25,500 – 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

एकूण पदे :- 4,625

परिक्षा वार व दिनांक :- (दि. 17 ऑगस्ट 2023 ले दि. 12 सप्टेंबर 2023) संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर जाहिर केली जाणार आहे.

परीक्षा केंद्र :- 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा TCS द्वारे घेतली जाईल.

अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाइन (प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ऑनलाइन मागविण्यात येत आहेत.)

जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumalink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.

पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-
पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी/ बाद) होण्याची शक्यता आहे.

पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

समांतर आरक्षणाबद्दल :- प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाच्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता पद उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल (कमी / वाढ होण्याची शक्यता आहे.

तलाठी भरती प्रक्रिये संदर्भात संपूर्ण माहिती साठी खालील डाउनलोड Now वर क्लिक करा.

तलाठी भरती 2023 जाहिरातDownload Now
तलाठी भरती जिल्हानिहाय रिक्त जागाDownload PDF
तलाठी भरती अधिकृत वेबसाइट Click here
तलाठी भरती ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकClick Here (अर्ज भरण्यास लवकरच सुरुवात)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment