भाषावार राज्यपुनर्रचना आयोग

 

(१) एस.के.दार आयोग :-
स्थापन -17 जून 1948(संविधान सभा कडून)
अहवाल – डिसेंबर 1948
अध्यक्ष – एस के दार(अलाहाबाद उच्च न्यायालय)

शिफारशी:-
1) राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा भाषा किंवा संस्कृती नव्हे.
2) आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली.

(२) जे.व्ही.पी समिती
स्थापन – डिसेंबर 1948
अहवाल -1949
सदस्य- पंडित नेहरू, सरदार पटेल, पट्टभी सीतारामय्या

शिफारस:-
1) भाषिक आधारावर अनुकुलता दर्शवली नाही.
2) राज्य पुनर्रचना आयोग लवकरच स्थापन केला जाईल असे आश्वासन दिले.
3) आंध्र प्रदेश ची निर्मिती केली (पोट्टी श्रीरामलू यांनी 56 दिवसाचे उपोषण केले)

(३) राज्य पुनर्रचना आयोग
स्थापन – डिसेंबर 1953
अहवाल – सप्टेंबर 1955
अध्यक्ष – फझल अली
सदस्य – के.एम.पनिकर, एच कुंझरू

शिफारसी :-
1) राज्य प्रमुखाचे पद समाप्त करण्यात यावे
2) एक राज्य एक भाषा या तत्त्वाचा अस्वीकार
3) विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे
4) गुजरात मराठवाडा महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य करावे
5) मूळ घटनेतील राज्याचे विभाजन करून त्याजागी 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment