SSC Result 2025 maharashtra board | 10 वी चा निकाल जाहीर

Maharashtra SSC Board Result 2025

महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र SSC बोर्डाने आज पुण्यात पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. १४,५५,४३३ विद्यार्थी पास झाले असून एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज दिनांक १३ मे २०२५ रोजी रोजी जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या ९ विभागीय मंडळांमार्फत १० वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान पार पडली. बोर्डाने २१ नोव्हेंबर २०२४ रोजी अधिकृत वेबसाइट वर महाराष्ट्र एसएससी वेळापत्रक २०२५ प्रसिद्ध केले होते.

या बोर्ड परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले होते. यात ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर २३ हजार ४९२ परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली.

विद्यार्थी आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून त्यांचा महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल २०२५ पाहू शकतात.

महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या ऑनलाइन निकालात विद्यार्थ्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सर्व विषयांमध्ये मिळालेल्या गुणांसह त्यांचे तपशील नमूद केले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ दिवस आधीच जाहीर होत आहे.

दहावी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण व निकालाची प्रिंटआऊट घेता येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

आज दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे.

10 वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील बटण वर क्लिक करा.

10 वी निकाल पाहण्यासाठी Click Here

10 वी निकाल Download Linkनिकाल लिंक
Link 1Download Result
Link 2Download Result
Link 3Download Result
Link 4Download Result
https://ssc.mahresults.org.in

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment