SIAC Result 2024 | SIAC निकाल जाहीर

SIAC Result 2024 | SIAC निकाल जाहीर

SIAC MUMBAI नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण सामाईक प्रवेश परीक्षा CET 2024-25

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC EXAM) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली आहे. सामाईक प्रवेश परीक्षा 2025 / SIAC CET 2025 साठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते.

मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र (नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर), यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिका संचलित सावित्रीबाई फुले अॅकॅडमी यांच्यामार्फत ‘केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२५’चे पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

SIAC MUMBAI नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण सामाईक प्रवेश परीक्षा CET 2024-25 प्रवेश परीक्षा 4 ऑगस्ट 2024 रोजी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा पार पडली. तर 11 सप्टेंबर रोजी अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली होती. या परीक्षेचा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

SIAC निकाल Download Now

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment