बॉलीवूडचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन.
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक (वय ६६) यांचे गुरुवारी दिल्लीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
13 एप्रिल 1956 हरियाणातील महेंद्रगड येथे सतीश कौशिक यांचा जन्म झाला. दिल्लीच्या किरोदिमल महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.
त्यानंतर नवी दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. NSD मध्ये असताना त्यांची अनुपम खेर यांच्याशी मैत्री झाली ती त्यांनी अखेरपर्यंत निभावली. त्यानंतर सतीश कौशिक यांनी पुण्यातील पुणे फिल्म इन्स्टिट्यूट (FTII) मध्ये शिक्षण घेतले आणि आणि त्यानंतर त्यांनी मुंबई गाठले.
मुंबई मध्ये गेल्यानंतर त्यांनी सुरुवातीला वर्षभर कपड्याच्या मिल मध्ये काम केले. मिल मध्ये कामाला असतानाच ते पृथ्वी थिएटर मध्ये नाटकात काम करत.
1983 साली प्रदर्शित झालेल्या कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ चित्रपटासाठी त्यांनी संवादलेखनही केले होते आणि छोटीशी भूमिकाही केली होती.
त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. 1987 साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील कॅलेंडर ही भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. मात्र अभिनय क्षेत्रातच न रमता पटकथालेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी स्वतःला आजमावून पाहिले.
‘द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा’ ‘कथासागर’, यासारख्या TV मालिकांमध्येही त्यांनी भूमिका बजावली.
त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल टाकले 1993 साली ‘रुप की रानी चोरों का राजा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट तिकीट खिडकीवर चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी तब्बूचे पदार्पण असलेल्या ‘प्रेम’ या चित्रपट, ‘मिस्टर बेचारा’ हा असे तिन्ही चित्रपट अपयशी ठरले. मात्र त्यांनी हार मानली नाही.
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके दिल में रहते है’ या अनिल कपूर आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने त्यांना दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा यश मिळवून दिले. या चित्रपटात त्यांनी जर्मन नावाच्या व्यक्तीची विनोदी भूमिका केली होती. ही भूमिका देखील गाजली. सलमान खानच्या अभिनेता असलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही सतीश कौशिक यांनीच केले होते.
2021 मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी यांना घेऊन केलेला ‘कागज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला हा चित्रपट ‘झी 5’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला होता.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘मासूम’ चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक दिग्दर्शन देखील केले.
1981 मध्ये त्यांनी पहिल्या ‘चक्र’ चित्रपटात बूट पॉलिश करणाऱ्या व्यक्तीची भूमिका केली. यासाठी त्यांना अवघे 500 रुपये मानधन मिळाले. अशी त्यांची अभिनयास सुरुवात झाली.
त्यानंतर त्यांनी ‘तेरे नाम’, ‘हम आप के दिल में रहते हैं’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या दिग्दर्शनापर्यंत मजल मारली.
पण त्यांना खरीखुरी ओळख झाली ती ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील कॅलेंडर या भूमिकेतून त्यामुळे ते घराघरात पोहोचले.
‘दिवाना मस्ताना’ मध्ये त्यांची पप्पू पेजर ही भूमिका लोकप्रिय ठरली.
‘मिस्टर इंडिया’ (1987), ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेस खिलाडी’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’, ‘परदेसी बाबू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली होती.
‘सूरमा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘यमला पगला दीवाना 3’, ‘मैं जिंदा हूं’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी काम केले.
सतीश कौशिक यांनी 4 दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये विनोदी कलाकार म्हणून भूमिका केल्या.
कौशिक यांना 2 वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.
त्यांना सर्वप्रथम राम लखन (1990) या चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार मिळाला
नंतर साजन चले ससुराल- (1997) या चित्रपटासाठी देखील फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार मिळाला.
Very nice information for all competitive exams. Thank you Sir for providing valuable information and tests for all students.
thank you very much