ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांची मिश्र दुहेरीचे उपविजेतेपद.

● ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी काल मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सानिया- बोपण्णा यांचा स्टेफनी-माटोस यांनी ७-६, ६-२ असा पराभव करत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

● ब्राझिलच्या राफेल माटोस आणि लुईसा स्टेफनी  यांनी ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

● या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेबरोबरच भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिचा ग्रँडस्लॅम स्पर्धामधील टेनिस प्रवास संपला आहे. सानिया मिर्झा अजून काही स्पर्धा खेळणार आहे.

● तिने कारकिर्दीची सुरुवात मेलबर्नमध्ये 2005 मध्ये केली होती. तेव्हा ती 18 वर्षांची होती. सानिया मिर्झाच्या कारकिर्दीतील ही 11 वा ग्रँडस्लॅम अंतिम सामना होता.

● सानियाने एकूण 43 दुहेरीची विजेतेपदे जिंकली आहेत. त्यात 6 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा समावेश आहे. सानिया मिर्झा महिला दुहेरीत 91 आठवडे WTA रँकिंगमध्ये नंबर 1 खेळाडू म्हणून स्थान मिळाले होते.

● ऑस्ट्रेलियन ओपन 2023 बरोबरच तिचा ग्रँडस्लॅम प्रवास संपवणार असल्याचे सानियाने आधीच जाहीर केले होते. तर 36 वर्षीय सानियाने टेनिसमधून निवृत्ती घेण्यापूर्वी अजून काही स्पर्धा खेळणार आहे.

● तर बोपण्णाने 2017 च्या फ्रेंच ओपनमध्ये टाइमा बाबोस सोबत एक विजेतेपद पटकावले होते.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment