पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांची नेपाळचे नवे प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती

माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी नेपाळचे नवे प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ही नियुक्ती केली.

प्रचंड यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. २७५ सदस्य असलेल्या नेपाळच्या लोकसभेत त्यांना १६५ सदस्यांचा पाठिंबा आहे. यापूर्वी ते २००८ ते २००९ तसेच २०१६-१७ कालावधी दरम्यान नेपाळच्या पंतप्रधान होते. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्याशी प्रचंड यांनी वाटाघाटी केली आहे. त्यामुळे आता पुष्प कमल दहल ‘प्रचंड’व के. पी. शर्मा ओली हे प्रत्येकी अडीच वर्षे पंतप्रधान असतील.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment