वनलायनर चालू घडामोडी नोट्स 23 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 23 November

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे निधन.
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधील कोल्लम येथे निधन झाले. 1989 साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. जयललिता 1997-2001 या काळात मुख्यमंत्री असताना फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही काम केले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलै पासून 4% महागाई भत्तावाढ
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून 4% महागाई भत्तावाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्यांकही थकबाकी देखील नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात महागाई भत्तावाढ दिली जाणार आहे. निवृत्तिवेतनधारक कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही चार टक्के महागाई भत्तावाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांनाही मागील चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबरच्या निवृत्तिवेतनापासून ही वाढ मिळणार आहे.

वकील सोमशेखर सुंदरसन यांची उच्च न्यायालयात नियुक्ती.
ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरसन यांची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारने आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी त्याबाबतची अधिसूचना काढली. सुंदरसन हे सर्वोच्च न्यायालयाने अडाणी-हीडेनबर्ग संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञ समितीमध्ये सदस्य होते. या समितीचा रिपोर्ट अलीकडे जाहीर करण्यात आला. सुंदरसन हे वकिली क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात कार्यरत होते. सुंदरसन यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सुमारे दहा महिन्यांपूर्वी केंद्राला केली होती. केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सुंदरसन यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ‘एक्स’ समाजमाध्यमावर केली आहे.

प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार
राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या दरात घर मिळावं, यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. मुंबईत, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्यावतीने आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनात ते बोलत होते. 

कॅनेडियन नागरिकांसाठी भारताची ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू
कॅनेडियन नागरिकांसाठी भारताने आपली ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. कॅनडासोबतच्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सप्टेंबर महिन्यापासून, भारत सरकारने कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली होती. भारताने गेल्या महिन्यात स्थगित केलेल्या, प्रवेश अर्थात एन्ट्री व्हिसा, व्यावसायिक अर्थात बिझीनेस व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसा यासह अन्य काही श्रेणींमढील व्हिसा सेवा पूर्ववत सुरु केल्या आहेत.

‘ऑस्ट्राहिंद-2023’ संयुक्त लष्करी सराव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात संयुक्त लष्करी सराव ‘ऑस्ट्राहिंद-2023’ हा 2nd युद्धसराव ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथे 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. प्रथम युद्धसराव 2022 मध्ये राजस्थान मध्ये आयोजित करण्यात आला होता.

● उत्तर आणि दक्षिण भारतामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये ‘काशी तमिळ संगम-2’ चे आयोजन केले जाईल.

● ICC ने भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे पाऊल उचलत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ‘मार्लन सॅम्युअल्स’वर 6 वर्षांची बंदी घातली आहे.

● राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशा राज्यातून ‘न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया’ नावाची राष्ट्रीय शैक्षणिक मोहीम सुरू केली आहे.

● ओडिशा राज्यातील संबलपूर येथे ‘9वी पॅन IIM जागतिक व्यवस्थापन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

● भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ‘गिरीश चंद्र मुर्मू’ यांची आगामी वर्षासाठी संयुक्त राष्ट्र महालेखा परीक्षक पॅनेलचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

● उत्तर प्रदेश राज्य सरकारने ‘हलाल प्रमाणित उत्पादनांवर’ बंदी घातली आहे.

● जलसंधारण जागृतीसाठी नुकतेच मेघालय राज्यात ‘वॉटर स्मार्ट किड कॅम्पेन’ सुरू करण्यात आले आहे.

● केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली येथे ‘8 व्या इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट 2023’ चे उद्घाटन केले.

● कर्नल सुनीता बीएस या सशस्त्र दल रक्तसंक्रमण केंद्र, दिल्ली कॅंटच्या पहिल्या महिला कमांडिंग अधिकारी झाल्या आहेत.

● संयुक्त अरब अमिराती (UAE) ने जगातील सर्वात मोठ्या ‘सिंगल साइट सोलर पॉवर प्लांट’चे उद्घाटन केले आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment