● निकारागुआ देशाची सौंदर्यवती शेन्नीस पलासियोस हिने पटकावला ‘मिस युनिव्हर्स’ 2023′ किताब.
मध्य अमेरिकेतील निकारागुआ देशाची सौंदर्यवती शेन्नीस पलासियोस हिने 72 वी ‘मिस युनिव्हर्स’ 2023 चा ‘किताब पटकावला. हा किताब पटकावणारी निकारागुआ देशाची पहिली स्पर्धक बनली आहे. मिस थायलंड अँटोनिया पोर्सिल्ड हिने दुसरा, तर मिस ऑस्ट्रेलिया मोरया विल्सन हिने तिसरा क्रमांक पटकावला. भारताची ‘मिस इंडिया’ श्वेता शारदा हिला या स्पर्धेत ‘टॉप 20’ पर्यंतच मजल मारता आली. गतवर्षीची ‘मिस युनिव्हर्स’ विजेती आरबोनी गेब्रियल हिने पलासियोस हिच्या डोक्यावर मुकुट चढवला. मध्य अमेरिकेतील देश अल साल्वाडोरमध्ये 72 वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा पार झाली. स्पर्धेमध्ये 84 देशांच्या सौंदर्यवतींमध्ये सहभाग घेतला होता.
● ICC च्या संघात 6 भारतीय क्रिकेटपटू
ICC कडून निवडण्यात आलेल्या संघात 6 भारतीय क्रिकेटपटू ची निवड करण्यात आली आहे. या संघाच्या कर्णधारपदी भारतीय रोहित शर्मा याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्वोच्च धावा करणारा विराट कोहली, भारताचा यष्टिरक्षक के. एल. राहुल याच्यासह रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा व मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजांचीही या संघात निवड करण्यात आली आहे.
● उजव्या विचारसरणीचे कडवे उजवे नेते जेव्हियर मिलेई अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष.
अर्जेंटिनात 1983 मध्ये लोकशाहीची झाल्यापासून पुनर्स्थापना झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिलेई यांना मिळालेले मताधिक्य सर्वाधिक आहे.
● ChatGPT ची निर्माती कंपनी ‘OpenAI’च्या पदावरून हटवण्यात आलेले CEO सॅम अल्टमन आणि अन्य सहसंस्थापकांना आपल्या मुख्य ‘AI’ संशोधन पथकात नियुक्त करत असल्याचे ‘मायक्रोसॉफ्ट’ ने आज जाहीर केले. ‘OpenAI’ने सॅम अल्टमन यांना शुक्रवारी CEO पदावरून अनपेक्षितरीत्या हटवले होते.
● भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मंत्रीस्तरीय बैठक आणि संवाद आज नवी दिल्लीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मंत्रीस्तरीय बैठक आणि संवाद आज नवी दिल्लीत होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस आणि परराष्ट्र मंत्री पेनी वाँग यांच्यासोबत बैठक घेतील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवले आहे. अनेक धोरणात्मक, संरक्षण आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. सामायिक हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर यात भर दिला जाईल.
● नागपुरात आज ‘महा-रेशीम अभियानाचे उद्घाटन
नागपुरात आज ‘महा-रेशीम अभियानाचं उद्घाटन करण्यात आले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि रेशीम संचालनालयाचे संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी प्रसिद्धी रथास हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. राज्यात 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत रेशीमशेती विषयी जनजागृती आणि प्रसिद्धी अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे
● संयुक्त राष्ट्र संघ वार्षिक मंच 2023 या 2 दिवसीय परिषदेचा आरंभ उद्या नवी दिल्लीत
आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि शांतता राखण्याच्या मुख्य उद्दिष्टाने संयुक्त राष्ट्र संघ वार्षिक मंच 2023 या 2 दिवसीय परिषदेचा आरंभ उद्या नवी दिल्लीत होत आहे. युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटना आणि संयुक्त राष्ट्र शांतता केंद्र यांच्या सहकार्याने या मंचाचे आयोजन करण्यात आले आहे. 1870 साली स्थापन झालेली युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही संस्था राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी बाबींच्या संशोधनासाठी आणि चर्चेसाठी थिंक टॅन्क म्हणून कार्यरत असलेली देशातली सर्वात जुनी संस्था आहे.