तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना JCB पुरस्कार
तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना त्यांच्या “फायर बर्ड” या कादंबरी साठी साहित्याचा प्रतिष्ठित JCB पुरस्कार मिळाला आहे, जो त्यांच्या तमिळ कादंबरी “आलंदापातची”चा इंग्रजी अनुवाद आहे. मुरुगन यांना पुरस्काराची रक्कम 25 लाख ₹ मिळणार आहे तर अनुवादकाला 10 लाख ₹ रक्कम दिली जाईल.
● कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) ला SKOCH नॅशनल अवॉर्ड – 2023 च्या ₹1 कोटीच्या अपघात निवारण सारिगे सुरक्षा विमा योजनेसाठी मिळाला आहे.
● FSSAI ने अनेक प्रादेशिक भाषांमध्ये फूड सेफ्टी कंप्लायन्स सिस्टम (FoSCoS) पोर्टल लाँच केले.
● एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाची मोहोर
ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आणि ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा विश्वचषक पटकावला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. अंतिम सामन्यात के. एल राहुलने 66, विराट कोहलीने 55 तर कर्णधार रोहित शर्माने 47 धावा केल्या. 137 धावा झळकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीर, तर स्पर्धेतल्या 11 सामन्यांमध्ये 765 धावा काढणाऱ्या विराट कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आले. विश्वचषकात कोणत्याही फलदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या.
भारतीय भांडवली बाजारात, विदेशी गुंतवणूकदारांकडून या महिन्यात आतापर्यंत सुमारे 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक
भारतीय भांडवली बाजारात, विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सुमारे चौदा हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्या अडीच महिन्यात विक्री सुरू ठेवल्यानंतर, एफपीआयनं नोव्हेंबरमध्ये 1 हजार 433 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. याच कालावधीत भारतीय कर्ज बाजारामध्ये त्यांनी 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. नोव्हेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात एकूण निव्वळ गुंतवणूक 13 हजार 763 कोटी रुपयांवर गेली.
● राष्ट्रपतीनी आज नवी दिल्ली येथे ‘2047 मधील एरोस्पेस आणि हवाई वाहतूक’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यमंत्री जितेंद्र सिंह या वेळी उपस्थित होते. संरक्षण आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान तयार करून एरोस्पेस क्षेत्र परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. या क्षेत्रातील कर्मचार्यांचे कौशल्य वाढवण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय तज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती, शैक्षणिक संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या दोन दिवसांत अनेक संस्था आणि विभागांचे प्रमुख या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
● जपानमधील सर्वात मोठी बौद्ध धर्मीय संघटना ‘सोका गक्काई’चे माजी प्रमुख डायसाकू इकेडा यांचं निधन
जपानमधील सर्वात मोठी बौद्ध धर्मीय संघटना ‘सोका गक्काई’चे माजी प्रमुख डायसाकू इकेडा यांचं निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. 13 व्या शतकातल्या जपानी बौद्ध भिख्कू निचिरेन यांच्या शिकवणीच्या आधारे इकेडा यांनी ‘सोका गक्काई’ ही संस्था जगभरात लोकप्रिय केली. ‘सोका गक्काई’ बौद्ध संघटनेचे जगभरात अंदाजे 1 कोटी 20 लाख सदस्य आहेत.
● यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा वर्ष 2023 चा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे.