Nagar Parishad DV Timetable | नगर परिषद कागदपत्रे तपासणी यादी आणि वेळापत्रक

नगर परिषद कागदपत्रे तपासणी यादी आणि वेळापत्रक

उमेदवारांना सूचना

दि. 24 JUN 2024

विषय :- नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ च्या प्रारुप निवडसूचीत नमूद उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीबाबत.

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ करीता दि. ११ जुलै, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५ ऑक्टोबर, २०२३ ते २४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. १५ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते.

दि. ११ जुलै, २०२३ रोजीच्या जाहिरातीत संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून एकूण ८ संवर्गाची भाग-१ प्रारुप निवडसूची व भाग-२ अतिरिक्त प्रारुप निवडसूची (प्रतिक्षायादी) दि. १० जून, २०२४ रोजी संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join स्पर्धा परीक्षा Whatsapp ग्रुप Join Now

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ मध्ये खालील नमूद संवर्गातील भाग-१ प्रारुप निवडसूचीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबत पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवज यांची मुळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह तसेच कागदपत्र पडताळणीकरीता सोबत जोडलेले “कागदपत्र तपासणी प्रपत्र” उमेदवारांनी भरुन प्रत्येक पानावर स्वाक्षरी करुन स्वतः कागदपत्र पडताळणीकरीता पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, तिसरा मजला शिवाजी चौक, पनवेल येथे खालील नमूद वेळी समक्ष उपस्थित रहावे. उमेदवारांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहता येणार नाही, राहिल्यास त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही.

नगर परिषद कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवार यादी Download Now

नगर परिषद कागदपत्रे तपासणी वेळापत्रक Download Now

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment