
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ ने सन्मानित करण्यात आले.
एन. चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे.
फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान एन. चंद्रशेखरन यांना प्रदान केला.
नुकताच मार्च 2023 मध्ये ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार किरन नादर (क्षेत्र – कला) यांना जाहीर झाला होता. त्या नवी दिल्लीतील किरण नादर म्युझियम ऑफ आर्ट च्या संचालिका आहेत.
तर नोव्हेंबर 2022 मध्ये ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुमित आनंद (व्यवसाय & उद्योग क्षेत्र) यांना जाहीर झाला होता. तसेच नोव्हेंबर 2022 मधेच पायल एस. कंवार यांना ‘शेवेलियर डे ऑर्डर नॅशनल डी’ मेरिट’ हा पुरस्कार जाहीर झाला होता.
नुकताच सप्टेंबर 2022 मध्ये ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डॉ. स्वाती परिमल यांना जाहीर झाला होता.
‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ या पुरस्काराबद्दल :-
1802 मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात सुरुवात केली.