Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना”

● योजनेचे स्वरूप काय ?
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु. १५००/- इतकी रक्कम दिली जाईल

● योजनेचे लाभार्थी कोण ?
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

● पात्रता काय ?
१. महाराष्ट्र राज्याचे  रहिवाशी असणे आवश्यक.

२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.

४. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक.

५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

● अत्यावश्यक कागदपत्रे ?
१. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड वरील नाव नमुद करावे)

२. अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला
(अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/मतदार ओळखपत्र/जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला)

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /अधिवास प्रमाणपत्र.

४. उत्पन्न प्रमाणपत्र (रु. २.५० लाखापर्यंत) /पिवळे/केशरी रेशनकार्ड

५. अर्जदाराचे हमीपत्र

६. बँक पासबुक (आधार लिंक असलेले)

७. अर्जदाराचा फोटो (स्वतः लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक)

● अपात्रता काय ?
१. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम

कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

४. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारा दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.

५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

● अर्ज करण्याची पद्धत :-
योजेनचे अर्ज पोर्टल / मोबाइल अॅपद्वारे / सेतु सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात.

● अर्ज करण्याची प्रक्रिया :- पात्र महिलेस ऑनलाइन नारीशक्ती दूत अॅपद्वारे अर्ज करता येईल. नारीशक्ती दूत अॅप ची लिंक खाली दिली आहे.
नारीशक्ती दूत अॅप ची लिंक :- येथे क्लिक करा

२) ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment