Maharashtra State Service Preliminary Exam 2024 Admit Card | महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध | MPSC Hall Ticket
Maharashtra Public Service Commission, Maharashtra Public Service Commission (MPSC) has released a hall ticket for attending the preliminary exam for the posts of State Services Examination. MPSC HallTicket- MPSC Admit Card.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहे.
१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक १ डिसेंबर, २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील प्रवेशपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सर्वांत शेवटी लिंक दिले.
२. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
३. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची (Debar) तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
४. प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा ०२२६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
५. प्रस्तुत परीक्षा यापूर्वी दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते व त्याकरीता उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे वितरित करण्यात आलेली होती. सदर जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना प्रस्तुत दिनांक १ डिसेंबर, २०२४ रोजीच्या परीक्षेकरीता प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र Download Now
Good