Skip to content

नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र (MITRA) या संस्थेची निर्मिती केली आहे.
राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारा विचार गट म्हणून मित्र ही संस्था काम पाहणार आहे.
अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत.
उपमुख्यमंत्री हे या संस्थेचे सहअध्यक्ष असणार आहेत.
त्यामुळे भविष्यात राज्यातील सर्व निर्णयांसाठी ही संस्था महत्त्वाची ठरणार आहे. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचा कार्यकाळ एकूण 3 वर्ष असेल.
प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला तेव्हा ते लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हाच्या त्यांच्या कामगिरीमुळे एक धडाकेबाज अधिकारी अशी त्यांची ओळख समाजामध्ये झाली.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात प्रवीण परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.
मुंबई महापालिकेचे ते आयुक्त म्हणून देखील त्यांनी कार्य केले. त्यानंतर त्यांनी युनेस्कोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या पदावरून ते निवृत्त झाले.