Maharashtra Nagar Parishad Final Result | महाराष्ट्र नगरपरिषद अंतिम निवडसूची
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
Maharashtra Nagar Parishad Final Result
Maharashtra Nagar Parishad Final Selection List
Directorate of Municipal Administration. Maharashtra Municipal Services, Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 (Maharashtra Nagar Parishad Bharti 2023) for 1782 Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Water Supply Drainage and Sanitation Engineer, Auditor / Accountant, Tax Assessment and Administrative Officer, Fire Officer & Sanitary Inspector Posts
महाराष्ट्र नगरपरिषद भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गांची 1782 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली.
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ करीता दि. ११ जुलै, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५ ऑक्टोबर, २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३, या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. १५ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते.
दि. ११ जुलै, २०२३ रोजीच्या जाहिरातीत संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून एकूण ८ संवर्गाची भाग-१ प्रारुप निवडसूची व भाग-२ अतिरिक्त प्रारुप निवडसूची (प्रतिक्षायादी) दि. १० जून, २०२४ रोजी संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
संदर्भ क्र.२ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ मधील भाग १ मधील प्रारुप निवडसुचीतील संवर्गनिहाय उमेदवारांना पहिली संधी दि. ०१/०७/२०२४ ते दि.१६/०७/२०२४ रोजी तसेच त्यामधील गैरहजर असलेल्या उमेदवारांना संदर्भ क्र. ४ अन्वये दुसरी संधी दि. २९/०४/२०२४ ते दि.३०/०७/२०२४ रोजी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहणेसाठी या संचालनालयाचे संकेतस्थळावर तसेच उमेदवारांची नोंदणीकृत ईमेलवर कळविण्यात आलेले होते.
त्याचप्रमाणे संदर्भ क्र. ३ नुसार भाग-२ मधील अतिरिक्त प्रारुप निवडसुचीतील (प्रतिक्षायादी) संवर्गनिहाय उमेदवारांना पहिली संधी दि. २२/०७/२०२४ ते दि.२६/०७/२०२४ रोजी आणि संदर्भ क्र.५ अन्वये गैरहजर उमेदवारांना दुसरी संधी म्हणून दि.०७/०८/२०२४ रोजी मुळ कागदपत्रासह कागदपत्र पडताळणी करीता उपस्थित राहणेस या संचालनालयाचे संकेतस्थळावर तसेच उमेदवारांची नोंदणीकृत ईमेलवर कळविण्यात आलेले होते.
आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी विविध पदांचे नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत नियुक्ती आदेश Download PDF
महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक संवर्ग नियुक्ती आदेश Download PDF
नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक अंतिम निवड यादी Click Here
आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी विविध पदांची अंतिम निवड सूची जाहीर करण्यात आली आहे.
नगरपरिषद अंतिम निवड सूची Download Now
कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहणेकरिता भाग १ व भाग २ मधील गैरहजर उमेदवारांना ही अंतिमं संधी 14 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आली. त्यानंतर आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा संवर्ग अंतिम निवडसूची जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा संवर्ग अंतिम निवडसूची Click Here