
Mahajyoti Maharashtra Engineering Services Pre-Exam Online Training Advertisement | महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्याथ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
महाज्योती महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण करिता नोंदणी अर्ज
● योजनेअंतर्गत लाभ काय असेल ? :-
सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 11 महीन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत Tablet आणि Data देण्यात येईल.
● योजनेच्या लाभासाठी पात्रता काय ? :-
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी,
2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा असावी,
3. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा असावी.
4. यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
5. प्रशिक्षणाकरीता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
6. विद्यार्थ्यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
7. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
8. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल.
9. विद्यार्थ्यांचे वय किमान 19 वर्ष व कमाल 41 वर्ष तसेच दिव्यांगाकरिता 43 वर्ष पेक्षा जास्त असू नये.
● प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असेल ?
1. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिन्यांचा असेल.
2. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
3. प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे असेल.
4. प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात असेल.
● आरक्षण कसे असेल ?:
सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :
1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
2. दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे.
3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
● अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
1. आधार कार्ड
2. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
3. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
5. पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक
6. दिव्यांग दाखला (दिव्यांग असल्यास)
7. अनाथ दाखला (अनाथ असल्यास)
● अर्ज कसा करावा ?
खाली ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावा.
अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.
विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही.
● जाहिरात PDF :- येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची लिंक :- Online अर्ज