MAHA TET 2025 Answer Key | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ उत्तर तालिका प्रसिध्द

MAHA TET 2025 Answer Key
MAHA TET Answer Key
TET Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/१२/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

परीक्षेसाठी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास परिषदेकडे दि. १९/१२/२०२५ ते दि. २७/१२/२०२५ अखेरपर्यंत पाठवता येतील. सदर आक्षेग/त्रुटी बाबतचे निवेदन पुराव्यासह https://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील, आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष/टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

सर्व Answer Key एकत्रित :- येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ लिंक येथे क्लिक करा

(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment