Krushi Sevak Bharti Result
Krushi Sevak Bharti Result
Krushi Sevak Result
Krushi Sevak Final Result
● कृषी सेवक पदासाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे.
● कृषी सेवक भरती 2023 चे निकाल यादी उपलब्ध करून दिले आहेत.
● परीक्षा – कृषी सेवक परीक्षा 16 जानेवारी ते 19 जानेवारी 2024 दरम्यान परीक्षा प्रक्रिया पार पडली. परीक्षा IBPS तर्फे घेण्यात आली. परीक्षेचे निकाल यादी झाले आहे; सर्वांनी पाहून घ्यावे.
● आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापूर & लातूर विभाग कृषिसेवकची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झाले आहे. त्यासंदर्भात निवेदन खालीलप्रमाणे :-
● कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चीत वेतनावर भरणेसंदर्भातील सरळसेवेने भरतीसाठी कोल्हापूर विभागाची जाहिरात दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. दिनांक १० जून २०२४ रोजी उमेदवारांची तात्पुरती/अंतरीम निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. दिनांक १८ जून २०२४ व १९ जून २०२४ रोजी उमेदवारांचे अर्हताविषयक मुळ कागदपत्र तपासणी करण्यांत आलेली आहे.
● या निवेदनासोबत कोल्हापूर विभागाची कृषी सेवक भरती 2023 च्या अनुषंगाने उमेदवारांची अंतिम निवड यादी व कागदपत्र तपासणी नंतरची सुधारीत अंतरीम प्रतिक्षा यादी (गुणवत्तेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांच्या नावासह) कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत येत आहे.
● अंतिम निवड यादी व सुधारीत अंतरीम प्रतिक्षा यादी च्या अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यांत येत आहे.
१) अंतिम निवडयादीत समावेश असलेल्या व समांतर आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रकरणपरत्वे अर्हताविषयक समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे शासन निर्णयांतील तरतूदींनुसार त्या-त्या शासकीय यंत्रणांकडे पडताळणी/पुनर्पडताळणी साठी पाठविण्यांत आलेली आहेत. समांतर आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांची अर्हताविषयक प्रमाणपत्रे पडताळणी झाल्यानंतरच त्यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सदर उमेदवारांची नावे अंतिम निवड यादीमध्ये समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे पडताळीच्या अधिन राहून समाविष्ट करण्यांत येत आहे.
२) निवडयादीत नाव समाविष्ट असलेल्या अनु, जाती, अनु. जमाती व खुल्या प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांव्यतीरिक्त इतर प्रवर्गातील उमेदवारांचे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र पडताळणीनंतर पात्रतेनुसार त्यांचे नियुक्ती आदेश निर्गमित करणेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सदर उमेदवारांचे नाव अंतिम निवड यादीत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र पडताळणीच्या अधिन राहून समाविष्ट करण्यांत आलेले आहे.
कृषिसेवक विभाग | निवड & प्रतीक्षा यादी |
कोल्हापूर कृषी सेवक अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी (7 August 2024 रोजी जाहीर) | Download Final Selection & Waiting List PDF |
लातूर कृषी सेवक अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी (7 August 2024 रोजी जाहीर) | Download Final Selection & Waiting List PDF |
नागपूर | Click Here |
अमरावती | Download PDF |
छत्रपती संभाजीनगर | Download PDF |
कोल्हापूर | Download PDF |