भारतीय वंशाचे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान बनले आहेत. देशाच्या युती सरकारसोबत त्यांनी केलेल्या कराराचा एक भाग म्हणून ते या पदावर आले आहेत. आयर्लंड संसदेच्या डेल या कनिष्ठ सभागृहाच्या विशेष अधिवेशनात मायकेल मार्टीन यांच्या जागी लिओ वराडकर यांची नियुक्ती करण्यास आयर्लंड संसद सदस्यांनी मान्यता दिली आहे .
आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष मायकेल हिगिन्स यांनी वराडकर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांची दुसऱ्यांना पंतप्रधान पदी निवड झाली आहे.
संकलन : सागर चिखले.