अंधांसाठीच्या टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक भारतीय संघानं पटकावला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघानं बांगलादेश संघाचा १२० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकात २७७ धावा केल्या. विजयासाठी २७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशानं सर्व बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारली.
ही अंधांसाठीची 3री टी ट्वेन्टी स्पर्धा होती. त्यात भारत, बांगलादेशाबरोबर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे देश सहभागी झाले होते.
संकलन : सागर चिखले.