
नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन
● 1 नोव्हेंबर – जागतिक शाकाहारी (व्हिगन) दिवस
● 2022 सालची संकल्पना – ‘फ्युचर नॉर्मल’ (Future Normal) अशी होती.
● 2023 सालची संकल्पना – निसर्गाशी सुसंवाद (Harmony with Nature), 2024 सालची संकल्पना अद्याप घोषित केली नाही.
● 1 नोव्हेंबर – झोजिला दिवस
● 1948 मध्ये सुरू झालेल्या ‘ऑपरेशन बायसन’ मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या शौर्य आणि धाडसी कारवाईचे स्मरण म्हणून हा दिन साजरा करण्यात येतो.
● झोजीला ही खिंड लडाख केंद्रशासित प्रदेशात आहे.
● 1 नोव्हेंबर – 7 घटकराज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस
● 1 नोव्हेंबर 2023 रोजी भारतातील 28 घटकराज्यांपैकी 7 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचा स्थापना दिवस साजरा केला.
● आंध्र प्रदेश (1956), छत्तीसगड(2002), हरियाणा(1966), कर्नाटक (1956), केरळ (1956), मध्य प्रदेश (1956) आणि पंजाब (1966) या राज्यांव्यतिरिक्त लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांची स्थापना याच दिवशी झाली होती.
● 2 नोव्हेंबर – पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी माफी समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस.
● 2013 मध्ये माली येथे झालेल्या फ्रेंच पत्रकारांच्या हत्येच्या स्मरणार्थ 2 नोव्हेंबर हा दिवस पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी माफी समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो.
● 5 नोव्हेंबर – जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस
● डिसेंबर 2015 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीने 5 नोव्हेंबर हा जागतिक त्सुनामी जागरुकता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 5 नोव्हेंबर 2016 ला पहिल्यांदा हा दिन साजरा केला गेला.
● 6 नोव्हेंबर – UN युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस
● 7 नोव्हेंबर – राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
● सप्टेंबर 2014 मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या दिनाची घोषणा केली होती.
● जागतिक आरोग्य संघटने (WHO) नुसार, कर्करोग हा मृत्यू घडवून आणणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात घातक आजार आहे. (2020 साली भारतातील 8.5 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला)
● 7 नोव्हेंबर – शिशु संरक्षण दिन
● 8 नोव्हेंबर – जागतिक रेडिओग्राफी दिवस
● 1895 मध्ये याच दिवशी जर्मन शास्त्रज्ञ विल्हेल्म कॉनराड रोंटजेन यांनी एक्स-रेडिएशन किंवा क्ष-किरणांचा शोध लावला होता.
● विल्हेल्म रोंटजेन यांना 1901 सालचा भौतिकशास्त्र मधील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता.
● 9 नोव्हेंबर – उत्तराखंड राज्य स्थापना दिवस
● उत्तरप्रदेश पुनर्रचना कायदा, 2000 अंतर्गत निर्माण झालेले उत्तराखंड हे भारताचे 27 वे राज्य आहे.
● 9 नोव्हेंबर – राष्ट्रीय विधी सेवा दिवस
● 1995 मध्ये याच दिवशी विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 लागू झाला होता .
● 9 ते 14 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह
● 10 नोव्हेंबर: शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन
● 2022 सालची संकल्पना – ‘शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान’ अशी आहे.
● 2023 सालची संकल्पना – ‘Building Trust In Science‘
● 2024 सालची संकल्पना – “Why Science Matters: Engaging Minds and Empowering Futures“.
● 2002 पासून दरवर्षी UNESCO द्वारे हा दिन साजरा केला जातो.
● 11 नोव्हेंबरः राष्ट्रीय शिक्षण दिन
● हा दिवस भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
● मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले.
● 2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे.
● 12 नोव्हेंबर: सार्वजनिक सेवा प्रसारण दिन
● महात्मा गांधी यांनी 1947 मध्ये दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या एकमेव भेटीच्या स्मरणार्थ दरवर्षी 12 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सेवा प्रसारण दिन (Public Service Broadcasting Day) साजरा केला जातो.
● फाळणीनंतर हरियाणातील कुरुक्षेत्र येथे तात्पुरते स्थायिक झालेल्या विस्थापित लोकांना (पाकिस्तानमधील निर्वासित) १२ नोव्हेंबर 1947 रोजी महात्मा गांधींनी रेडीओवरून संबोधित केले होते.
● 12 नोव्हेंबर – जागतिक न्यूमोनिया दिन
● 2022 ची संकल्पना : जगभरातील न्यूमोलाइट 2022 नामक निमोनिया जागरुकता मोहिमेवर आधारित आहे. या मोहिमेची संकल्पना आणि घोषवाक्य नPneumonia Affects Everyone हे आहे. 2023 संकल्पना : “Every Breath Counts: Stop Pneumonia in Its Track”.
● 14 नोव्हेंबर – जागतिक मधुमेह दिन
● मधुमेहामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आणि ते कसे टाळावे याकडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) पाळला जातो.
2021 ते 2023 सालांसाठी संकल्पना – Access to Diabetes Care
● 15 नोव्हेंबर: जनजाती गौरव दिवस
● भारताच्या राष्ट्रपतींनी 15 नोव्हेंबर 2022 या जनजाती गौरव दिनी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
● 16 नोव्हेंबर 2022 – पहिला राष्ट्रीय लेखापरीक्षण दिन
● 16 नोव्हेंबर – राष्ट्रीय पत्रकारिता दिन
● भारतीय प्रेस कौन्सिलच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकारिता दिन (National Press Day) भारतभर साजरा केला जातो
● 16 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस
● 1996 पासून दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
● 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय सहिष्णुता जागतिक शिखर परिषद संपन्न झाली.
● 17 नोव्हेंबर – राष्ट्रीय अपस्मार ( Epilepsy) दिन
● राष्ट्रीय एपिलेप्सी जागरूकता दिवस 17 नोव्हेंबर आहे. या संदर्भात, एपिलेप्सी रोग, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल जनजागृती करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. एपिलेप्सी हा एक तीव्र मेंदूचा विकार असल्याचे मानले जाते जे “फिट” द्वारे चिन्हांकित केले जाते. हे सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम करत असल्याचे दिसून आले आहे.
● 17 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
● नाझी सैन्याने 17 नोव्हेंबर 1939 रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन स्थापन केला. या दिवशी 9 विद्यार्थी नेते आणि या घटनेदरम्यान विद्यार्थ्यांचे शौर्य अपवादात्मक होते.
● 17 नोव्हेंबर 2022 – जागतिक तत्त्वज्ञान दिन
● दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जागतिक तत्त्वज्ञान दिन (World Philosophy Day) साजरा केला जातो. 2022 मध्ये हा दिन 17 नोव्हेंबर रोजी आला.
● 2022 ची संकल्पना – The Human of the Future
● जागतिक तत्त्वज्ञान दिवस पहिल्यांदा 21 नोव्हेंबर 2002 रोजी साजरा करण्यात आला. युनेस्कोने 2005 मध्ये हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित.
● 18 नोव्हेंबर – बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी जागतिक दिवस
● ‘संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभे’ने 18 नोव्हेंबर हा बाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून बचाव करण्यासाठीचा जागतिक दिवस (World Day for the Prevention of and Healing from Child Sexual Exploitation, Abuse and Violence) म्हणून नोव्हेंबर 2022 मध्ये घोषित केला.
● 18 नोव्हेंबर – राष्ट्रीय निसर्गोपचार दिन
● औषधमुक्त थेरपीद्वारे सकारात्मक मानसिक आणि शारीरिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 18 नोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय निसर्गोपचार दिन NoNatiya Naturopathy Day) साजरा केला जातो.
● 2022 मध्ये 5 वा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला.
● 2018 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
● 18 नोव्हेंबर 1945 रोजी, महात्मा गांधी ऑल इंडिया नेचर क्युअर फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष बनले आणि निसर्ग उपचाराचे फायदे सर्व वर्गातील लोकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करारावर स्वाक्षरी केली, म्हणून हा दिवस राष्ट्रीय निसर्गोपचार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
● 19 नोव्हेंबर – जागतिक शौचालय दिन
● लोकांचे आरोग्य राखण्यासाठी शाश्वत स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) पाळला जातो.
● 2023 ची संकल्पना – “Accelerating Change for Safe Sanitation.” 2022 ची संकल्पना Making the invisible visible.
● 2013 पासून दरवर्षी जागतिक शौचालय दिन पाळला जातो.
● 2019 मध्ये संपूर्ण देशाने खुले शौचमुक्त राज (ODF) दर्जा प्राप्त केला
● 20 नोव्हेंबर – जागतिक बाल दिन
● 2022 ची संकल्पना – Inclusion for every child; 2023 संकल्पना – “For every child, every right.”
● 20 नोव्हेंबर ही तारीख निवडण्यामागचे कारण म्हणजे, 1959 साली ह्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने बालहक्क घोषणापत्र (Declaration of the Rights of the Child) स्वीकारले होते. शिवाय 1989 साली ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या झाल्या.
● सर्वात पहिला बालदिन ऑक्टोबर 1953 मध्ये जिनेव्हाच्या ‘इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड वेल्फेअर’ या संघटनेच्या पुढाकाराने जगभर साजरा करण्यात आला. त्यानंतर व्ही. के. कृष्णमेनन ह्यांनी आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पनेला प्रोत्साहन देत ती आमसभेपूढे मांडली, जी 1954 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने स्वीकारली. त्यानुसार 1954 साली 20 नोव्हेंबरला प्रथम जागतिक बालदिन साजरा झाला.
● भारतातील जागतिक बाल दिनानिमित्त, राष्ट्रपती भवन, संसद भवन, राज्य विधानसभेच्या इमारती आणि ऐतिहासिक वास्तू यासारख्या देशातील प्रतिष्ठित इमारती #GoBlue दिव्यांनी उजळल्या होत्या.
● 21 नोव्हेंबर – जागतिक टेलिव्हिजन (TV) दिन.
● 24 नोव्हेंबर – शहिदी दिवस
● प्रत्येक वर्षी २४ नोव्हेंबर हा शिखांचे नववे गुरू, गुरु तेग बहादूर यांचा शहीदी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांनी मुघलांच्या जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात लढा दिला होता.
● 25 नोव्हेंबर: महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
● 2022 ची संकल्पना – ‘UNITE Activism to End Violence against Women and Girls’; 2023 संकल्पना – “Invest to Prevent Violence against Women & Girls.”
● 1960 मध्ये राफेल टुजिल्लो यांच्या आदेशानुसार हत्या झालेल्या डोमिनिकन रिपब्लिकच्या कार्यकर्त्या मीराबल भगिनींना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे.
● 26 नोव्हेंबर: राष्ट्रीय दूध दिवस
● ‘श्वेत क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो.
● या निमित्ताने पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाद्वारे डेअरी क्षेत्रातील संबंधित भागधारकांच्या विजेत्यांना राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच धामरोड, गुजरात आणि हेसरघट्टा, कर्नाटक येथे IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) लॅब देखील सुरू करण्यात आल्या.
● दरवर्षी जून महिन्याचा पहिला दिवस जागतिक दूध दिन म्हणून पाळला जातो.
● 2021 राष्ट्रीय दूध दिवस हा डॉ. वर्गीस कुरियन यांची 100 वी जयंती होती.
● 26 नोव्हेंबर: भारतीय संविधान दिन
● भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.
● याला राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखले जाते..
● 28 नोव्हेंबर – रेड प्लॅनेट दिन
● नासाने मंगळावरील महत्त्वाची माहिती आणि याचित्रे घेण्यासाठी 1964 मध्ये ‘मरिनर 4 मिशन’ वरील हिंसाचार प्रक्षेपित केले होते. त्या दिवसाच्या स्मरणार्थ 28 नोव्हेंबर रेड प्लॅनेट डे (Red Planet Day) म्हणून ओळखला जातो.
● 29 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय जग्वार दिन
● 29 नोव्हेंबर – पॅलेस्टिनी लोकांसोबत आंतरराष्ट्रीय एकता दिवस
● 30 नोव्हेंबर: रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृती दिन
3 thoughts on “नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in November”