जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिन
● 1 जुलै – चार्टर्ड अकाउंटंट दिन
● Institute of Chartered Accountants of India (ICAI) संस्थेच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ 1 जुलै रोजी राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट्स दिन/ सीए दिवस साजरा केला जातो.
● 2023 हे ICAI च्या स्थापनेचे 75 वे वर्ष आहे. 1 जुलै 1949 रोजी ही संस्था स्थापन करण्यात आली होती.
● ICAI भारतातील लेखा व्यवसाय आणि आर्थिक लेखापरीक्षणासाठी विशेष परवाना आणि नियामक प्राधिकरण म्हणून काम करते. नॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) सह सर्व लेखा आणि वित्त संस्था या ICAI ने जारी केलेल्या लेखा मानकं मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास बांधील आहेत.
● 1 जुलै – राष्ट्रीय डॉक्टर दिन
● प्रख्यात चिकित्सक, शिक्षणतज्या स्वातंत्रसैनिक आणि राजकारणी डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती १ जुलै रोजी भारत राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctor’s Day) म्हणून साजरा करतो.
● आधुनिक पश्चिम बंगालचे निर्माते म्हणूनही ओळखले जाणारे, डॉ. रॉय यांनी 1948 ते 1962 या काळात पश्चिम बंगालचे द्वितीय मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि अनेक वैद्यकीय संस्थांच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली.
● डॉ. रॉय यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ, भारत सरकारने 1999 मध्ये 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून अधिकृतपणे घोषित केला.
● 2023 संकल्पना – Celebrating Resilience and Healing Hands.
● कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात काम करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांचे धैर्य साजरे करणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे.
● 2 – जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिन
● इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशनद्वारे (AIPS) 2 जुलै 1994 रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिनाची स्थापना पॅरिसमधील उन्हाळी ऑलिम्पिकच्या अनुषंगाने केली होती.
● 2 जुलै – जागतिक UFO दिन (Unidentified Flying Objects)
● 3 जुलै – आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस
● झिरो वेस्ट युरोपने एकाल वापर असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या मुद्द्याला लक्ष्य करणारी मोहीम 3 जुलै 2008 रोजी सुरू केली होती. त्यानंतर, 2015 मध्ये, युरोपियन युनियनने एकाल वापर असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी विशिष्ट निर्देश जारी केले.
● 6 जुलै – जागतिक झूनोसिस दिवस
● प्रख्यात फ्रेंच जीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्य कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ६ जुलै रोज जागतिक झूनोसिस दिवस (World Zoonoses Day पाळला जातो.
● 1885 मध्ये या दिवशी, पाश्चर यांनी रेबीजर्च पहिली लस दिली होती. तो झुनोटिक रोग प्रतिबंधकातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला होता.
● झुनोटिक रोग हे असे आजार आहेत जे प्राणी किंवा कीटकांपासून मानवांमध्ये प्रसारित होऊ शकतात.
● झुनोटिक रोगाचे अलीकडील उदाहरण म्हणजे कोविड- १९ होय.
● 10 जुलै – राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन
● 22 वा मत्स्य शेतकरी दिन हैद्राबाद येथे साजरा करण्यात आला.
● 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन
● 2023 ची संकल्पनाः स्त्री-पुरुष समानतेची शक्ती उघड करणे: आपल्या जगाच्या अनंत शक्यतांना अनलॉक करण्यासाठी महिला आणि मुलींचा आवाज बुलंद करणे.
● 11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्या 5 अब्जांच्या संख्येवर पोहोचल्यानंतर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने 1989 मध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आता हा दिवस लोकसंख्या नियंत्रण उपायांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो.
● 12 जुलै – जागतिक कागदी पिशवी दिन
● 12 जुलै – जागतिक मलाला दिन
● 15 जुलै – जागतिक युवा कौशल्य दिन
● संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यानुसार 2014 पासून हा दिन साजरा करण्यात येत आहे.
● 2023 ची संकल्पना: परिवर्तनशील भविष्यासाठी कुशल शिक्षक, प्रशिक्षक आणि युवा (Skilling teachers, trainers and youth for a transformative future)
● 16 जुलै – जागतिक सर्प दिन
● 17 जुलै – आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन
● 18 जुलै – आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन
● 20 जुलै : आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस
● 1969 मध्ये ऐतिहासिक अपोलो 11 मोहिम चंद्रावर उतरल्याच्या स्मरणार्थ 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) साजरा केला जातो.
● 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
● अपोलो 11 मोहिमेंतर्गत अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी चंद्रावरील ट्रॅक्विलिटी बेस नावाच्या जागेवर पाऊल ठेवून इतिहास घडवला होता. हे दोघे अंतराळवीर चंद्रावर पाउल ठेवणारे अनुक्रमे प्रथम व द्वितीय व्यक्ती ठरले होते. या मोहिमेतील तिसरे अंतराळवीर मायकेल कॉलिन्स यांनी चंद्राच्या कक्षेतील कोलंबिया कमांड मॉड्यूलचे पायलटींग केले होते.
● 20 जुलै – जागतिक बुद्धिबळ दिवस
● 1924 मध्ये FIDE या जागतिक बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 जुलै हा जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून पाळला जातो.
● या बुद्धिबळ खेळाचा उगम भारतात 1500 वर्षे झाल्याचे मानण्यात येते. तो ‘चतुरंग’ नावाने ओळखला जात असे.
● 22 जुलै – जागतिक फ्रजाईल एक्स जागरूकता दिवस (World Fragile X Awareness Day)
● Fragile X किंवा मार्टिन बेल सिंड्रोम (Martin- Bell Syndrome) या दुर्मिळ अनुवांशिक आजाराबाबत जागरुकता वाढवण्यासाठी 2021 मध्ये या दिनाची सुरूवात झाली.
● Fragile X सिंड्रोम (FXS) किंवा मार्टिन- बेल सिंड्रोम (Martin-Bell Syndrome) :-
● हा एक अनुवांशिक रोग आहे जो पालकांकडून बालकांकडे येतो, ज्यामुळे बालकांमध्ये बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व येते.
● 22 जुलै – पाय अंदाज दिवस (Pi Approximation Day)
● अपूर्णांक 22/7 हा पाय (Pi/A) चा सामान्य अंदाज आहे, जो आर्किमिडीजच्या दोन दशांश स्थान आणि तारखांसाठी अचूक आहे.
● प्रसिद्ध स्थिरांक 3.14 च्या संख्येनुसार तारखेनुसार अनेक लोक 14 मार्च हा पाय दिवस म्हणून साजरा करतात. तथापि, तारखा लिहिण्याचे असे स्वरूप बहुतेक अमेरिकेमध्ये पाळले जाते.
● 22 जुलै – जागतिक मेंदू दिन
● 22 जुलै – राष्ट्रीय आंबा दिवस
● आंतरराष्ट्रीय आंबा महोत्सवाची मुळे 1987 मध्ये शोधली जाऊ शकतात जेव्हा भारतीय राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने आंबा साजरा करण्याची उज्ज्वल कल्पना मांडली होती.
● 23 जुलै – राष्ट्रीय प्रसारण दिवस
● दरवर्षी देशभरात 23 जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिवस साजरा केला जातो.
● 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत बॉम्बे स्टेशनवरून भारतातील पहिले रेडिओ प्रसारण करण्यात आले होते. त्यामुळे हा दिन निवडण्यात आला आहे.
● 24 जुलै – आयकर दिन (Income Tax Day
● पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी 1860 मध्ये याच दिवशी सर जेम्स विल्सन यांनी भारतात आयकर लागू केला होता.
● हा दिवस भारतात 2010 सालापासून साजरा केला जातो.
● 25 जुलै – जागतिक बुडणे प्रतिबंधक दिन
● हा दिन एप्रिल 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ठरावाद्वारे घोषित करण्यात आला होता.
● हा दिवस महत्त्वाचा आहे कारण बुडणे ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे ज्यामुळे गेल्या दशकात 2.5 दशलक्षाहून अधिक मृत्यू झाले आहेत. बहुतेक मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले आहेत.
● WHO च्या जागतिक आरोग्य अंदाजानुसार 2019 मध्ये जवळपास 236,000 लोकांनी बुडून आपला जीव गमावला. यापैकी फक्त 50% पेक्षा जास्त मृत्यू 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये होतात आणि बुडणे हे 5-14 वर्षे वयोगटातील बालकांसाठी जगभरातील मृत्यूचे सहावे प्रमुख कारण आहे.
● नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, भारतात 2021 मध्ये 36,362 बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, ज्यात लहान बालकांचे प्रमाण अधिक आहे.
● 26 जुलै – कारगिल विजय दिवस
● यावर्षी 24 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
● हा दिवस कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना समर्पित आहे.
● भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले.
● 26 जुलै – जागतिक खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन
● इक्वेडोर या छोट्या देशातील खारफुटीवर अवलंबून असणाऱ्या जनतेने दरवर्षी 26 जुलै रोजी खारफुटी जंगलांच्या संरक्षणार्थ हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
● संयुक्त राष्ट्रांच्या यूनेस्को या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2015 साली सर्व जगभर खारफुटी संवर्धनाबाबत जागरूकता आणण्यासाठी ‘जागतिक खारफुटी दिन’ साजरा करण्याचे ठरले.
● 28 जुलै – जागतिक हिपॅटायटीस / यकृतशोथ दिन
●जागतिक हिपॅटायटीस दिन (World Hepatitis Day) दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो.
● 2023 ची संकल्पना: एक जीवन, एक यकृत (One life, one liver)
● 29 जुलै – जागतिक निसर्ग संवर्धन दिन
● 2023 ची संकल्पना: जंगले आणि उपजीविकाः लोक आणि ग्रहाची शाश्वतता (Forests and Livelihoods: Sustaining People and Planet)
● नवी दिल्ली स्थित नॅशनल झूलॉजिकल पार्कने जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला आणि त्याला मिशन- लाईफच्या उद्दिष्टांशी जोडले.
● संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल कराराच्या ग्लासगो येथे झालेल्या 26 व्या शिखर परिषदेमध्ये (UNFCCC COP26) पंतप्रधान मोदींनी जागतिक हवामान कृतीमध्ये वैयक्तिक वर्तनांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने मिशन लाईफ (LiFE: Lifestyle for Environment) सादर केले होते.
● 29 जुलै – जागतिक व्याघ्र दिन
● 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
● 30 जुलै: आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
● 2011 पासून हा दिन साजरा करण्यात येत आहे.
● संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची स्थापना केली.
● 30 जुलै – व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिन(World Day against Trafficking in Persons)
● 2023 ची संकल्पना: तस्करीच्या प्रत्येक बळीपर्यंत पोहोचा, कोणालाही मागे सोडू नका (Reach avery victim of trafficking, leave no one behind)
● ब्लू हार्ट मोहीम (Blu Heart Campaign):
● ब्लू हार्ट मोहीम मार्च 2009 मध्ये UNODCचे कार्यकारी संचालक अँटोनियो मारिया कोस्टा यांनी व्हिएन्ना येथे जागतिक महिला परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना सुरू केली होती.
● ब्लू हार्ट मोहीम जगभरात मानवी तस्करी आणि त्याचा लोकांवर आणि समाजावर होणारा परिणाम याबद्दल जागरुकता वाढवते.
● 31 जुलै: जागतिक वनसंरक्षक (रेंजर) दिन
● वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी आणि मौल्यवान नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणार्या शूर व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 31 जुलै रोजी जागतिक रेंजर दिन (World Ranger Day) साजरा केला जातो.
● 2023 ची संकल्पना: 30 by 30 (2030 पर्यंत पृथ्वीवरील 30% भूभाग आणि महासागर क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून नियुक्त करण्याचा 30 बाय 30 हा जगभरातील सरकारांसाठीचा उपक्रम आहे.)