
जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिन
● 2 जानेवारी – महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन / पोलिस रेझिंग डे
● 3 जानेवारी – महिला मुक्ती दिन / महिला शिक्षण दिन
● 4 जानेवारी : जागतिक ब्रेल दिन
दरवर्षी जागतिक ब्रेल दिन (World Braille Day) 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. अंध आणि अंशतः दृष्टिहीन लोकांसाठी मानवी हक्कांच्या पूर्ण पूर्ततेसाठी संप्रेषणाचे साधन म्हणून ब्रेलच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
19 व्या शतकातील फ्रान्समधील लुई ब्रेल याने या वर्णमालेचा शोध लावला. 2009 मध्ये लुई ब्रेल यांची 200 वी जयंती होती. 2019 पासून हा दिन साजरा करण्यात येत आहे.
● 6 जानेवारी – पत्रकार दिन
● 6 जानेवारी: जागतिक युद्ध अनाथ दिन
युद्धातील अनाथ बालकांबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ६ जानेवारी रोजी जागतिक युद्ध’ अनाथ दिन (World Day of War Orphans) पाळला जातो
● 9 जानेवारी – प्रवासी भारतीय दिन
● 10 जानेवारी – विश्व हिंदी दिवस
10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात झालेल्या ‘ पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त 2006 मध्ये तो पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
● 10 जानेवारी – जागतिक हास्य दिन
● 10 ते 16 जानेवारी – स्टार्टअप-इंडिया नवोन्मेष सप्ताह
16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यासाठी, देशभरात 10 ते 16 जानेवारी 2023 दरम्यान स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह (Startup India Innovation Week 2023) राबविण्यात आला. स्टार्टअप परिसंस्थेचे भागधारक आणि तिला सक्षम करणाऱ्यांपर्यंत पोहोचणे, हे यामागील उद्दिष्ट आहे.
● 12 जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंद जयंती)
● 14 जानेवारी – भूगोल दिन (सी. डी. देशमुख जयंती)
● 14 जानेवारी 2023 : 7 वा माजी सैनिक दिन (Armed Forces Veterans’ Day)
14 जानेवारी 1953 रोजी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे औपचारिकपणे सेवेतून निवृत्त झाले. त्यामुळे 14 जानेवारी हा दिन माजी सैनिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2017 सालापासून हा दिन साजरा करण्यात येत आहे.
● 14 ते 28 जानेवारी: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (महाराष्ट्रात)
● 15 जानेवारी 2023 : भारताचा 75 वा लष्कर दिन
भारतीय लष्कराने 15 जानेवारी 2023 रोजी हैदराबादमधील परेड मैदानावर 75 वा लष्कर दिन साजरा केला. हा दिवस देशाच्या सैनिकांचा सन्मान करतो.
1949 मध्ये या दिवशी फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित रँक धारण करणाऱ्या 2 लष्करी अधिकाऱ्यांपैकी जनरल करिअप्पा हे केवळ दुसरे व्यक्ती होते. सॅम माणेकशॉ हे पहिले फिल्ड मार्शल ठरले होते.
● 16 जानेवारी – राष्ट्रीय स्टार्टअप दिवस
16 जानेवारी 2016 रोजी भारतात स्टार्टअप इंडिया अभियानाची सुरुवात झाली होती. 2022 मध्ये भारताने पहिला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला.
● 21 जानेवारी 2023 जानेवारी – मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा स्थापना दिन
भारत सरकारने 21 जानेवारी 1972 रोजी ईशान्य क्षेत्र (पुनर्रचना) कायदा, 1971 अंतर्गत या 3 राज्यांना राज्याचा दर्जा दिला होता.
● 24 जानेवारी – राष्ट्रीय बालिका दिवस
महिला आणि बालविकास मंत्रालयाने 2008 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती.
● 24 ते 30 जानेवारी – राष्ट्रीय बालिका सप्ताह
यंदा महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 24 ते 30 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय बालिका सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
● 25 जानेवारी – राष्ट्रीय पर्यटन दिवस
यंदा तेलंगणातील पोचमपल्ली या गावात राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला गेला. हे ठिकाण हाताने विणलेल्या उत्पादनांसाठी आणि इकत सिल्क साडीसाठी प्रसिद्ध आहे.
तसेच जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
● 25 जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिन
2023 ची संकल्पना – Nothing Like Voting. I Vote for Sure
25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे 25 जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
मतदानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी 2011 सालापासून हा दिन साजरा करण्यात येत आहे.
● 26 जानेवारी 2023 – 74 वा प्रजासत्ताक दिन / गणतंत्र दिन
यावर्षी भारताने 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे कर्तव्य पथावर (आधीचा राजपथ) संचालनाचे/परेडचे आयोजन करण्यात आले.
● 27 जानेवारी: आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन
हिटलरच्या ऑशविट्झ बिरकेनाऊ नाझी छळ आणि कत्तल छावणीतील ज्यू लोकांच्या 1945 मध्ये झालेल्या सुटकेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा दिवस निवडला होता.
2023 ची संकल्पना – Home and Belonging
● 29 जानेवारी 2023 – जागतिक कुष्ठरोग दिन
जगभरात कुष्ठरोग आणि त्यावरील उपचारांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक कुष्ठरोग दिन (World Leprosy Day) दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो. 2023 मध्ये दिन 29 जानेवारीला साजरा करण्यात आला.
2023 ची संकल्पना – Act Now. End Leprosy.
जागतिक कुष्ठरोग दिनाची स्थापना 1954 मध्ये फ्रेंच पत्रकार राऊल फोलरेओ यांनी केली. कुष्ठरोग निर्मुलनासाठी काम करणाऱ्या महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस निवडला होता.
● 30 जानेवारी – हुतात्मा दिन
30 जानेवारी रोजी गांधीजींची पुण्यतिथी असते त्यानिमित्ताने हा दिन साजरा केला जातो.
● Best चालू घडामोडी + GK चॅनेल Link Click Here
● Whatsapp Channel Link Click Here