तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठ्या स्कायवॉक ब्रिजचे नुकतेच 16 मे 2023 रोजी उद्घाटन करण्यात आले. ब्रिजची लांबी 570 मीटर तर रुंदी 4.2 मीटर आहे.
चिलीमधील 5,000 वर्षे जुने झाड अधिकृतपणे जगातील सर्वात जुने वृक्ष म्हणून ओळखले गेले आहे.
नेपाळी महिला गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी नुकतेच 27 व्यांदा एव्हरेस्ट शिखर गाठून विक्रम केला.
टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना भारत आणि फ्रान्स यांच्यातील व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डी ला लीजन डी’ऑनर प्रदान करण्यात आला
भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने आसाममध्ये ‘जल राहत’ या संयुक्त पूर मदत सरावाचे आयोजन केले.
जागतिक स्तरावर 46 शहरांमध्ये घरांच्या वार्षिक किमतीत मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 18 मे रोजी साजरा केला जातो.
प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो या न्यूयॉर्क पोलीस विभागात (NYPD) सर्वोच्च पदावर असलेल्या दक्षिण आशियाई महिला बनल्या आहेत.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव 4th समुद्र शक्ती – 23 इंडोनेशिया मधील बाटम मध्ये 17 ते 19 मे 2023 दरम्यान पार पडला.
जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस 17 मे रोजी साजरा करण्यात आला.