ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ
सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यास परवानगी दिली आहे.
ही संजय कुमार मिश्रा यांची ED संचालक म्हणून अखेरची मुदतवाढ असणार आहे. मिश्रा यांचा कार्यकाळ येत्या ३१ जुलै रोजी संपणार होता.
सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत मिश्रा यांना अडीच महिना म्हणजेच 15 सप्टेंबर पर्यंत पदावर कायम राहण्यास परवानगी दिली आहे.
नवी दिल्लीत 2 दिवसीय अखिल भारतीय शिक्षा परिषद आयोजित
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा 2020 ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून देशातल्या शिक्षण व्यवस्थेत झालेल्या बदलांचा आढावा घेण्यासाठी 29 जुलै आणि 30 जुलै रोजी नवी दिल्लीत 2 दिवसीय अखिल भारतीय शिक्षा परिषद आयोजित केली जाणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगरमध्ये सेमीकॉन इंडिया संमेलनाचं उद्घाटन
गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे आज दिनांक 28 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेमीकॉन इंडिया 2023 या संमेलनाचे उद्घाटन झाले.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या 3 दिवसीय संमेलनाचे आयोजन केले आहे.
सेमी कंडक्टर क्षेत्रात भारताचा झालेला विकास आणि भारताच धोरण ही जगासमोर मांडण हा या संमेलनाचा उद्देश आहे. तर सेमीकंडक्टर क्षेत्रात व्यवस्था तंत्राला प्रोत्साहन देण ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
जगातील उद्योग, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या जागतिक नेत्यांना एकत्र आणून सेमी कंडक्टर क्षेत्रात जागतिक दर्जाचे डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता असलेल्या भारताला या क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून नावारूपाला आणणे हा या संमेलनाचा उद्देश आहे.
ISSF ज्युनिअर विश्व नेमबाजी स्पर्धा 2023 भारतानं पटकावले दुसरे स्थान
दक्षिण कोरियातल्या चांगवन येथे झालेल्या ISSF ज्युनिअर विश्व नेमबाजी स्पर्धा 2023 मध्ये पदतालिकेत भारताने दुसरे स्थान पटकावले.
भारतीय नेमबाजांनी 6 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदक मिळवत एकूण 17 पदके मिळवली.
या चॅम्पियनशिप स्पर्धेत 21 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील पिस्तुल, रायफल आणि शॉटगन स्पर्धेत 90 हून अधिक नेमबाज सहभागी झाले होते.
नेमबाज अभिनव शॉ आणि कमलजीत यांनी प्रत्येकी 2 सुवर्णपदके पटकावली. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात साइन्यम हिने सुवर्णपदक पटकावले. तर दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र गट आणि महिलांच्या चमू हिने कांस्य पदक पटकावले.